कोरेगाव भीमा जुगार अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांची कारवाई

क्राईम

सात जणांवर गुन्हे दाखल करत ७३ हजारांचा ऐवज जप्त

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे जुगार अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कारवाई करुन ७३ हजार रुपयांचा ऐवज जप्त करत प्रविण पाल, स्वप्नील भाउसाहेब फडतरे, दत्तात्रय दशरथ कान्हुरकर, बाळासाहेब मारूती भवार, भरत वैज्यनाथ राउत, अरुण गणेश वानखेडे, गोविंद मारूती हराळे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.

कोरेगाव भीमा (ता शिरुर) येथील ज्ञानराज पार्क येथील प्लॉटमध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये प्रवीण पाल हा व्यक्ती काही लोकांकडून कल्याण नावाचा मटका खेळवत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, पोलीस हवालदार संदीप कारंडे, पोलीस नाईक राकेश मळेकर, विकास पाटील, पोलीस शिपाई आशोक केदार, प्रतीक जगताप यांनी सदर ठिकाणी जात छापा टाकला असता त्यांना सदर ठिकाणी काही व्यक्ती हातात चिठ्ठ्या घेऊन कल्याण नावाचा मटका चालवीत असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान पोलिसांच्या पथकाने तेथील इसमांना ताब्यात घेत मटका साठी वापरण्यात येणारे साहित्य तसेच तेथे मिळून आलेली एम एच १२ एल ई ६२०३ ही दुचाकी व रोख रक्कम असा सुमारे ७३ हजार आठशे पंधरा यांचा ऐवज जप्त केला.

याबाबत पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक विकास पाटील रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी प्रविण पाल रा. वढू बुद्रुक (ता. शिरुर) जि. पूणे, स्वप्नील भाउसाहेब फडतरे, दत्तात्रय दशरथ कान्हुरकर, बाळासाहेब मारुती भवार, भरत वैज्यनाथ राउत, अरूण गणेश वानखेडे, गोविंद मारुती हराळे सर्व रा. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राकेश मळेकर हे करत आहे.