Pune ZP Election

झेडपी निवडणूक! शिरुर तालुक्यातील गटनिहाय यादी पुढीप्रमाणे…

राजकीय

पुणेः पुणे जिल्हा परिषद निवडणूकी आरक्षणाची सोडत आज (गुरुवार) जिल्हा परिषद पुणे येथे काढण्यात आली. यामध्ये इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, जमाती, सर्वसाधारण महिला आरक्षणाची सोडत पार पडली. इतर मागास वर्ग व अनुसूचित जाती जमाती महिलांना आरक्षित करण्यात आल्या आहेत. यावर हरकती घेण्यासाठी मुदत ठेवण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात आज आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली आहे.

शिरुर तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गटांमध्ये इतर मागास प्रवर्ग पुरुषांसाठी २२ इतर मागासवर्ग प्रवर्गातील महिलांसाठी आणि सर्व साधारण महिलांसाठी ११ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. उर्वरित जागा या खुल्या गटासाठी असणार आहे.

शिरुर तालुक्यातील जिल्हा परिषद गटनिहाय यादी पुढीलप्रमाणे :

१) टाकळी हाजी – कवठे यमाई — OBC राखीव पुरुष
२) शिरूर ग्रामीण – निमोणे — ST अनुसूचित जमाती राखीव पुरुष
३) कारेगांव – रांजणगाव गणपती — जनरल पुरुष
४) करंदी – कान्हुरमेसाई — जनरल पुरुष
५) सणसवाडी – कोरेगांव भीमा — जनरल महिला
६) तळेगाव ढमढेरे – शिक्रापुर — OBC राखीव पुरुष
७) न्हावरा – निमगांव म्हाळुंगी — जनरल पुरुष
८) वडगांव रासाई – मांडवगण फराटा — ST अनुसूचित जमाती राखीव पुरुष

शिरूर तालुक्यातील गट-गण जाहिर; कुठे खुशी.. कुठे गम…

पंचायत समिती गण जाहीर करण्यात आलेले गण व आरक्षण:
कोरेगाव भीमा (अनुसूचित जाती),
करंदी (अनुसूचित जमाती),
कान्हूर मेसाई व शिक्रापूर (नागरिकांचा मागास प्रवर्ग),
निमोणे व वडगाव रासाई (नागरिकाचा मागास प्रवर्ग स्त्री),
टाकळी हाजी, सणसवाडी, तळेगाव ढमढेरे, न्हावरे, निमगाव म्हाळुंगी (सर्वसाधारण),
कवठे येमाई, शिरूर ग्रामीण, कारेगाव, मांडवगण फराटा, रांजणगाव गणपती (सर्वसाधारण स्त्री)

hotel matoshree ranjangaon ganpati
hotel matoshree ranjangaon ganpati