Mangaldas Bandal

शिरूरमध्ये तिहेरी लढत, मंगलदास बांदल यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर…

मुख्य बातम्या राजकीय

शिरूर (तेजस फडके) : शिरुर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिरुर मतदार संघात शिवाजीराव आढळराव पाटील, डॉ. अमोल कोल्हे आणि मंगलदास बांदल अशी तिहेरी लढत होणार आहे.

राज्यात महाविकास आघाडी आणि वंचितची जागावाटपाची चर्चा फिस्कटल्यानंतरही वंचित बहुजन आघाडीने मविआच्या काही उमेदवारांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे. वंचित आघाडीने पुण्यातून वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर शिरूरमधून मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

खंडणी आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात दोन वर्षे तुरुंगात बंद असलेल्या आणि काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आलेल्या मंगलदास बांदल यांना वंचित बहुजन आघाडीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली आहे.

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मंगलदास बांदल यांना 26 मे 2021 ला पोलीसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुढची दोन वर्षे मंगलदास बांदल तुरुंगात बंद होते. त्याआधी पुण्यातील एका सराफ व्यावसायिकाच्या कुटुंबातील व्यक्तींचे स्पाय कॅमेराच्या माध्यमातून चित्रीकरण करून त्या सराफ व्यावसायिकाला पन्नास कोटी रुपयांना ब्लॅकमेल केल्याच्या आरोपावरून देखील मंगलदास बांदल यांना आधी अटक करण्यात आली होती. मंगलदास बांदल यांच्यावर पुण्यातील रांजणगाव एम आय डी सी परिसरात खंडणी आणि अपहरणाचे अनेक गुन्हे नोंद आहेत.

मंगलदास बांदल हे यांनी 2009 ला भारतीय जनता पक्षाकडून विधानसभा निवडणुक लढवली होती. त्याआधी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. तर त्याआधी ते अपक्ष उमेदवार म्हणून जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. 2019 ला त्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. तुरुंगातून जामीनावर बाहेर आल्यानंतर मंगलदास बांदल यांनी राज ठाकरे, अजित पवार, शरद पवार, देवेंद्र फडणवीस अशा अनेक नेत्यांच्या भेटी घेण्याचा प्रयत्न केला होता. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पक्ष प्रवेशावेळी देखील मंगलदास बांदल उपस्थित होते. त्यानंतर काहीच दिवसांत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्याचबरोबर मनोज जरांगे यांचीही त्यांनी भेट घेतली होती. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून मंगलदास बांदल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिरुरमध्ये आढळराव पाटील, अमोल कोल्हे आणि मंगलदास बांदल यांच्यात तिहेरी लढत होणार आहे.

शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांच्याविरोधात बॅनरबाजी; 5 वर्ष कुठे होतात??

शिरूरमधील राजकारण तापलं! आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना फटकारलं…

शिरूर लोकसभा निवडणूक! शिवाजीराव आढळराव पाटील की अमोल कोल्हे?

Video: शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाया पडले अमोल कोल्हे…

तिरंगी लढत! शिरूर लोकसभेच्या निवडणूकीत उतरले मंगलदास बांदल…

शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश…

राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशापूर्वी शिवाजीराव आढळराव पाटील यांचे महत्वपूर्ण भाष्य…

‘वोट के लिये कुछ भी करेगा’ अभिनेत्यांनाही लाजवेल असे नेत्यांचे अभिनय

शिरूर लोकसभेसाठी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पक्ष आणि चिन्हही ठरले…

अजित पवार यांचा अमोल कोल्हे यांच्या विरोधात मोठा डाव; शिरूरमधील महायुतीचा उमेदवार ठरला…

शिवाजीराव आढळराव पाटील हातात बांधणार घड्याळ! मुहूर्तही ठरला…

शिरूरमध्ये आढळराव पाटील यांचे तिकीट कन्फर्म? कट्टर विरोधकाची घरी जाऊन भेट…

आढळराव पाटील आणि अजित पवार यांचा एकाच गाडीत प्रवास; चर्चांना उधाण…

अजित पवारांच्या टिकेनंतर अमोल कोल्हेंचा पलटवार, पक्षात येण्यासाठी लपून छपून भेटीगाठी कशाला घेतल्या…?

शिरुरच्या शेतकरी मेळाव्यात अजित पवारांची अमोल कोल्हेंवर टिका, तर अशोक पवारांबाबत सौम्य भुमिका

अमोल कोल्हे यांच्या सारखा सेलिब्रिटी उमेदवार देणं ही आमची चूक: अजित पवार

शिवाजीराव आढळराव पाटील खासदारकीबाबत म्हणाले…

शिवाजीराव आढळराव पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

अमोल कोल्हे यांचा कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावरून काढता पाय…

शिरुर लोकसभेसाठी होणार काटे की टक्कर! अमोल कोल्हे विरोधात…

मंत्र्याचा दावा; अमोल कोल्हे कधीही अजित पवार गटात येऊ शकतात…

अजित पवार यांच्या चॅलेंजनंतर अमोल कोल्हे यांनी मानले आभार…

अजित पवार, अमोल कोल्हे यांच्यानंतर आढळराव पाटील म्हणाले…

अमोल कोल्हे यांचे नाव न घेता अजित पवार यांची जोरदार टीका केली; आता पाडणारच…