Adhalrao Patil Amol Kolhe

शिरूर लोकसभा निवडणूक! शिवाजीराव आढळराव पाटील की अमोल कोल्हे?

मुख्य बातम्या राजकीय

शिरूर (तेजस फडके) : शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात पुन्हा शिवाजीराव आढळराव पाटील हेच उमेदवार असल्याने निवडणूक चुरसेची होणार आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघाची मागील काही दिवसांपासून मोठी चर्चा रंगली आहे. आढळराव पाटील यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांच्याविरोधात उभे असलेले अमोल कोल्हे निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील असा तगडा सामना पाहायला मिळणार आहे. अमोल कोल्हे यांना पाडणार म्हणजे पाडणार, असा निर्धार अजित पवार यांनी घेतला आहे. त्यामुळे या मतदार संघात अजित पवार यांना मोठा कस लावावा लागणार आहे. दोघे एकमेकांवर मागील काही दिवसांपासून टीका टिपण्णी करताना दिसत आहे. त्यात अजित पवार यांनीदेखील लक्ष घातले आहे. त्यामुळे येत्या काळात शिरुर मतदारसंघातील जनता नेत्याला निवडून देतात की अभिनेत्याला निवडून देतात, हे पाहणे महत्वाचे असणार आहे. दुसरीकडे मंगलदास बांदल यांनी सुद्धा दंड थोपाटले आहेत.

2019मध्ये झालेल्या निवडणूकीत डॉ. कोल्हे यांना त्यांनी केलेला मालिकांमधील भूमिकेचा मोठा फायदा झाला होता, परंतु आता तशी फारशी परिस्थिती राहिलेली नाही. मतदारसंघात ते फारसे न फिरल्यामुळे त्याचा फटका त्यांना या निवडणुकीमध्ये जास्त बसण्याची शक्यता आहे. किंबहुना, हाच मुद्दा आढळराव यांच्याकडून मांडला जात आहे. 2019 च्या निवडणुकीमध्ये अमोल कोल्हे यांची कोरी पाटी होती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची एकसंध ताकद त्यांच्या सोबतीला होती. कार्यकर्ते व नेत्यांनी वर्गणी काढून निवडणुकीचा सगळा खर्च भागवला होता.

डॉ. कोल्हे वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांच्यावर असलेली नाराजी आजही कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर प्रथम अमोल कोल्हे हे अजित पवार यांच्यासोबत गेले होते, त्यांना पाठिंबा देत मंत्रिमंडळाच्या शपथविधीलादेखील उपस्थित होते. नंतर त्यांनी ’यू’ टर्न घेत शरद पवारांसोबत राहिले. ऐनवेळी शेतकर्‍यांचा प्रश्न घेत आक्रोश मोर्चा काढला. परंतु केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोल्हे यांनी काढलेला आक्रोश मोर्चा सगळ्याच मतदारांना पटला असे नाही.

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सुद्धा शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. फक्त तिकीट मिळण्यासाठी त्यांनी पक्ष बदलल्याची चर्चा मतदार संघामध्ये आहे. यामुळे मतदाराही नाराजी व्यक्त करत आहेत. डॉ. कोल्हे मतदार संघात फिरकत नाही तर आढळराव पाटील यांनी तिकीटासाठी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे मंगलदास बांदल तयारीत आहेत. यामुळे नक्की कोणाला फायदा होणार, हे पुढील काही दिवसात पाहायला मिळणार आहे.

Video: शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाया पडले अमोल कोल्हे…

तिरंगी लढत! शिरूर लोकसभेच्या निवडणूकीत उतरले मंगलदास बांदल…

शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश…

राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशापूर्वी शिवाजीराव आढळराव पाटील यांचे महत्वपूर्ण भाष्य…

‘वोट के लिये कुछ भी करेगा’ अभिनेत्यांनाही लाजवेल असे नेत्यांचे अभिनय

शिरूर लोकसभेसाठी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पक्ष आणि चिन्हही ठरले…

अजित पवार यांचा अमोल कोल्हे यांच्या विरोधात मोठा डाव; शिरूरमधील महायुतीचा उमेदवार ठरला…

शिवाजीराव आढळराव पाटील हातात बांधणार घड्याळ! मुहूर्तही ठरला…

शिरूरमध्ये आढळराव पाटील यांचे तिकीट कन्फर्म? कट्टर विरोधकाची घरी जाऊन भेट…

आढळराव पाटील आणि अजित पवार यांचा एकाच गाडीत प्रवास; चर्चांना उधाण…

अजित पवारांच्या टिकेनंतर अमोल कोल्हेंचा पलटवार, पक्षात येण्यासाठी लपून छपून भेटीगाठी कशाला घेतल्या…?

शिरुरच्या शेतकरी मेळाव्यात अजित पवारांची अमोल कोल्हेंवर टिका, तर अशोक पवारांबाबत सौम्य भुमिका

अमोल कोल्हे यांच्या सारखा सेलिब्रिटी उमेदवार देणं ही आमची चूक: अजित पवार

शिवाजीराव आढळराव पाटील खासदारकीबाबत म्हणाले…

शिवाजीराव आढळराव पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

अमोल कोल्हे यांचा कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावरून काढता पाय…

शिरुर लोकसभेसाठी होणार काटे की टक्कर! अमोल कोल्हे विरोधात…

मंत्र्याचा दावा; अमोल कोल्हे कधीही अजित पवार गटात येऊ शकतात…

अजित पवार यांच्या चॅलेंजनंतर अमोल कोल्हे यांनी मानले आभार…

अजित पवार, अमोल कोल्हे यांच्यानंतर आढळराव पाटील म्हणाले…

अमोल कोल्हे यांचे नाव न घेता अजित पवार यांची जोरदार टीका केली; आता पाडणारच…