शिरुर नगरपरीषदेच्या व्यापारी संकुलाच्या भुमिपुजपनाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीकडून हायजॅक

मुख्य बातम्या

इतर पक्षांना डावलल्याने नाराजीचा सुर

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर नगरपरिषदेत लुडबुड करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून वारंवार होत आहे. शिरुर नगर परीषदेच्या वतीने होणाऱ्या व्यापारी संकुलाच्या भुमिपुजनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे फोटो झळकत आहे.

शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), मनसे, भाजप यांना डावलण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉग्रेसकडून होत आहे. यामुळे नगर परीषदेवर टिका होत असून मुख्याधिकारी नक्की काय करतात.?

हा कार्यक्रम शासकीय कार्यक्रम आहे कि खाजगी…?

नगर परीषदेवर प्रशासक असताना मुख्यमंत्री, पालकमंत्री व इतर पक्षीय नेत्यांचे फोटो न टाकता व त्यांना निमंत्रण न देता कार्यक्रम घेणाऱ्या राष्ट्रवादीचा निषेध शिरुर शहरातील नागरीकांनी सोशल मिडियावर केला आहे.

1 thought on “शिरुर नगरपरीषदेच्या व्यापारी संकुलाच्या भुमिपुजपनाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीकडून हायजॅक

  1. प्रथम मुळात हा कार्यक्रम प्रशासकीय नाही. कारण आजच मा.जिल्हाधिकारीसो यांनी आज आदेश काढलाय कि पालकमंत्री यांच्या शिवाय जो कार्यक्रम आयोजित केला जाईल त्या ठिकाणी प्रशासनाने उपस्थित राहायचे नाही. राहिला ह्या भुमिपुजन कार्यक्रमातील अनियमितता , डाव , घश्यात घालणं हे उद्या उघड करू.

Comments are closed.