ashok-pawar-hrishiraj-pawar

आमदार अशोक पवार यांच्या मुलाच्या प्रकरणात वाघोली कनेक्शन?

क्राईम मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (तेजस फडके): आमदार अशोक पवार यांचे सुपुत्र व रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषीराज पवार (वय २६) यांचे अपहरण करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. ऋषीराज पवार यांनी व्हिडिओच्या माध्यमातून घडलेली घटना कथन केली आहे. या घटनेनंतर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. पण, या घटनेमध्ये तथ्य असून या प्रकरणात वाघोली कनेक्शन असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून अशोक पवार उभे राहिले आहेत. वडिलांसाठी ऋषीराज पवार हे मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे प्रचार करीत होते. यावेळी एका टोळक्याने त्यांचे अपहरण केले व दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी विवस्त्र करून मारहाण केली. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

ऋषिराज पवार यांनी सांगितले की, भाऊ कोळपे हा दिवसभर आमच्या प्रचारात फिरला. मी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याला माझ्या गाडीत बसवले. आमची गाडी मांडवगण वडगाव पर्यंत नेली असता तिथून पुढं चारचाकी गाडी जाणार नाही असे कोळपे याने सांगितले. तिथं कोळपेच्या मित्रांच्या दोन दुचाकी आलेल्या होत्या. कच्च्या रस्त्यातून बंगल्यापर्यंत दुचाकी नेण्यात आल्या. बंगल्यात नेण्यात आलं, तिथं एकांतात चर्चा करायची आहे असं सांगत रुममध्ये बोलावण्यात आले. भाऊ कोळपे आणि त्यांच्या दोन मित्रांनी दरवाजा बंद केला. एक बेड होता, तिथं बसवलं, दोघांनी हात पाय पकडले, त्यांच्यापैकी एकानं शर्टची बटणं उघडायला सुरुवात केली. मी त्याला विरोध केल्यानंतर धक्काबुक्की करायला लागले. यावेळी पैशासाठी हे सगळं करत असाल तर करु असे मी त्यांना सांगितले. पण, तिथं पडलेलं कापड घेतलं, माझ्या तोंडावर दाबलं, गळा दाबला, मारुन टाकण्याची भीती घातली. यानंतर कापड काढून त्यांनी पिशवीतून एक दोरी काढून दाखवली. त्यांनी आम्हाला व्हिडीओ हवाय असे सांगितले. त्यासाठी 10 कोटी रुपयांची ऑफर आल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या जीवाला घाबरुन अडचण आणणार नाही हे सांगितले. त्यांनी माझे कपडे काढले, चौथा माणूस होता त्यांनी एक बाई आणली होती. दरवाजा उघडल्यावर बाई आत घेतली. इतर दोघे बाहेर गेले. भाऊ कोळपे याने मोबाईलचा कॅमेरा बाहेर काढला, महिलेला बेडवर झोपण्यास त्याने सांगितलं. तो व्हिडीओ घेत होता. भाऊ कोळपे याने फोटो, व्हिडीओ काढले, व्हिडीओत तो सूचना देतोय, हे रेकॉर्ड झालंय. त्यानंतर महिलेला बाहेर काढल्यानतंर इतर दोघे आत आले.’

पुण्यातून या व्हिडीओसाठी समोरच्या पार्टीकडून 10 कोटी रुपयांची ऑफर आल्याचे भाऊ कोळपे आणि इतरांनी सांगितल्याचे ऋषिराज पवारने म्हटले आहे. बाईक वरुन जात असताना मित्रांना मेसेज करुन ठेवले होते, हा आला की त्याला पकडा असे सांगितलं होते. जसा भाऊ कोळपे आला तसा त्याला धरण्यात आले. आम्ही पकडून त्याला मित्राच्या घरात कोंडून ठेवले, असे ऋषिराज पवार यानं म्हटले आहे.

मांडवगण फराटा परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून वाघोली परिसरातील एक चारचाकी मोटार फिरत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. पोलिसांनी संबंधित व्हिडिओ पाहिले असून, या घटनेमध्ये तथ्य असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. शिवाय, या घटनेमागे राजकीय मुख्य सूत्रधार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांकडून चौकशीनंतर अधिकृत माहिती समोर येईल. पण, सध्या तरी या प्रकरणात तथ्य असल्याची माहिती पुढे आली आहे.

काल आमदार अशोक पवार यांचे पुत्र ऋषीराज पवार यांच्याबाबत झालेला प्रकार हा निंदनीय आहे. अशा प्रकारे खालच्या पातळीचे राजकारण यापुर्वी कधीच झाले नव्हते. शिरुर हा राजकारणाबाबत सुसंस्कृत म्हणुन ओळखला जातो. हा घृणास्पद प्रकार घडवुन आणुन विरोधकांनी नक्की काय साध्य केले. योद्धा जेव्हा पराभुत होत नाही. त्यावेळेस त्याच चारित्र्य हनन केलं जात. असाच काहीसा हा प्रकार असुन जोपर्यंत या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराचा पोलिस शोध लावत नाहीत. तोपर्यंत आम्ही सर्व महिला शांत बसणार नाही.
– राणी कर्डीले, सामाजिक कार्यकर्त्या

आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून मारहाण अन् खंडणी…

शरद पवार यांच्याशी निष्ठा ठेवल्याने कुटुंबाला, ‘घोडगंगा’ला त्रास : अशोक पवार

Video: अशोक पवार झाले भावुक; उपस्थितही गहिवरले…

शिरुर-हवेलीत अशोक पवारांची प्रचारात आघाडी अन महायुतीत मात्र बिघाडी…?

शिरूरमधील काँग्रेस अशोक पवार यांच्याच पाठीशी; कार्यकर्त्यांचा निर्धार…

घोडगंगा कारखान्याच्या कर्जावरून अशोक पवारांचे थेट अजित पवारांना चॅलेंज…

मला दम देण्यापेक्षा दादांनी कांद्याला आणि दुधाला चांगला बाजारभाव द्यावा; अशोक पवारांचं प्रत्युत्तर

शिरूर-हवेली मतदार संघामधून आमदार म्हणून तुमची पसंती कोणाला असेल?

View Results

Loading ... Loading ...

2 thoughts on “आमदार अशोक पवार यांच्या मुलाच्या प्रकरणात वाघोली कनेक्शन?

Comments are closed.