Shivajirao Adhalrao Patil

राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशापूर्वी शिवाजीराव आढळराव पाटील यांचे महत्वपूर्ण भाष्य…

मुख्य बातम्या राजकीय

शिरुर  (तेजस फडके): लोकसभेच्या निवडणुकीसाठी हाताला घड्याळ बांधणार असलो तरीही माझ्या हातात शिवबंधन कायम बांधलेले असेल, असे शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटले आहे. पक्षप्रवेशापूर्वी आढळराव पाटील यांनी विविध मुद्यांवरदेखील भाष्य केले आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. शिरुर लोकसभा मतदार संघाचे ते राष्ट्रवादीकडून उमेदवार असणार आहेत. ते म्हणाले, ‘महाविकासआघाडी सरकारच्या काळात मी अजित पवार यांच्यावर नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायचो. आजचा प्रवेश ही घरवापसी अथवा लोकसभेच्या अनुषंगाने पर्याय नाही. तर नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी हे आम्ही उचलेलं पाऊल आहे. अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचे अजित पवार यांनी दिलेले आव्हान मी माझ्या खांद्यावर उचलले .’

‘शिरुरची जागा मिळवण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरु होते. अजित पवार महायुतीत सामील होण्याआधीपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला सांगितले होतं की शिरुर मतदार संघात काम सुरु करा, आपल्याला मतदार संघ जिंकायचा आहे. तेव्हापासून पायाला भिंगरी लावून मतदार संघाचं काम करतोय. काम करण्यासाठी महायुतीच्या सरकारने प्रचंड बळ दिलं. विकास निधी दिला. सर्व प्रकारचं सहकार्य केले. 2004 साली राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. 20 वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून काम केले. त्यानंतर आता पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश घेणार आहात ही घरवापसी आहे का?, असे विचारल्यावर ही घरवापसी नाही आणि मी पक्ष बदलणाऱ्यातला नाही, असे त्यांनी स्पष्ट केलं आहे. 20 वर्ष धनुष्यबाणाशी प्रामाणिक आहे आणि राष्ट्रवादीत प्रवेश करेपर्यंत प्रामाणिक राहिलो,’ असेही आढळराव पाटील म्हणाले.

नाटकाच्या स्टेजवर शिवशाही दाखवून लोकांची मतं मिळवण्याची परिस्थिती आता राहिली नाही, असेही आढळराव पाटील यांनी म्हणताना अमोल कोल्हे यांना टोला लगावला आहे.

‘वोट के लिये कुछ भी करेगा’ अभिनेत्यांनाही लाजवेल असे नेत्यांचे अभिनय

शिरूर लोकसभेसाठी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पक्ष आणि चिन्हही ठरले…

अजित पवार यांचा अमोल कोल्हे यांच्या विरोधात मोठा डाव; शिरूरमधील महायुतीचा उमेदवार ठरला…

शिवाजीराव आढळराव पाटील हातात बांधणार घड्याळ! मुहूर्तही ठरला…

शिरूरमध्ये आढळराव पाटील यांचे तिकीट कन्फर्म? कट्टर विरोधकाची घरी जाऊन भेट…

आढळराव पाटील आणि अजित पवार यांचा एकाच गाडीत प्रवास; चर्चांना उधाण…

अजित पवारांच्या टिकेनंतर अमोल कोल्हेंचा पलटवार, पक्षात येण्यासाठी लपून छपून भेटीगाठी कशाला घेतल्या…?

शिरुरच्या शेतकरी मेळाव्यात अजित पवारांची अमोल कोल्हेंवर टिका, तर अशोक पवारांबाबत सौम्य भुमिका

अमोल कोल्हे यांच्या सारखा सेलिब्रिटी उमेदवार देणं ही आमची चूक: अजित पवार

शिवाजीराव आढळराव पाटील खासदारकीबाबत म्हणाले…

शिवाजीराव आढळराव पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

अमोल कोल्हे यांचा कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावरून काढता पाय…

शिरुर लोकसभेसाठी होणार काटे की टक्कर! अमोल कोल्हे विरोधात…

मंत्र्याचा दावा; अमोल कोल्हे कधीही अजित पवार गटात येऊ शकतात…

अजित पवार यांच्या चॅलेंजनंतर अमोल कोल्हे यांनी मानले आभार…

अजित पवार, अमोल कोल्हे यांच्यानंतर आढळराव पाटील म्हणाले…

अमोल कोल्हे यांचे नाव न घेता अजित पवार यांची जोरदार टीका केली; आता पाडणारच…