तहसिलदार दाखवा अन शिवसेनेकडून २१ हजार रुपये मिळवा…

मुख्य बातम्या

शिवसेना नागरीकांनी हेलपाटे मारुन काम न करुन गाजर दाखवल्याने मनसे ही निषेध म्हणुण गाजर वाटप करणार

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तहसिल कार्यालयात (घोडनदी) गेले एक वर्षे होऊन प्रभारी तहसीलदार तहसिल कार्यालयाचा कारभार चालवत आहे. अतिरिक्त चार्ज असल्यामुळे पूर्ण वेळ शिरुर तहसिल कार्यालयामध्ये तहसीलदार नसल्याने अनेक कामे प्रलंबित आहे.

अनेक कामांसाठी नागरीक वारंवार तहसिल कार्यालयमध्ये रोज हेलपाटे मारत आहे. पण तहसीलदार हे भेटतंच नाही. अनेक प्रकारच्या परवानगी, समस्या,१५५, रस्ता केसेस यांचे निकाल शिरुर तहसीलदार पुर्ण वेळ उपलब्ध नसल्यामुळे होत नाही. त्यामुळे विनाकारण सर्वसामान्य लोकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत आहे. नागरीकांची कामे प्रलंबित असल्यामुळे येत्या ९ जानेवारीला शिवसेना अनोख्या पद्धतीने आंदोलन करणार आहे.

तहसील कार्यालय, शिरुर येथे “कोण तहसीलदार देतं का? तहसीलदार…” जे कोणी शिरुर (घोडनदी ) पूर्ण वेळ तहसीलदार मिळवून देईल त्यांना शिवसेना २१००० रु. बक्षीस देणार आहे, असे आंदोलन येत्या सोमवारी ९ जानेवारी रोजी शिरुर तहसिल कार्यालय समोर सकाळी ११ वा. करणार असल्याचे शिवसेनेचे सुनिल जाधव व अविनाश घोगरे यांनी सांगितले.

तसेच लोकांनी हेलपाटे मारुन त्यांची कामे न झाल्याने व पुर्ण वेळ तहसिलदार नसल्याने गाजर दाखवण्याच काम शिरुर तहसिल प्रशासनाने केले आहे. त्याचा निषेध म्हणुण शिरुर मनसेच्या वतीने येत्या ७ जानेवारीला तहसिल कार्यालयात गाजर वाटपाचे अनोखे आंदोलन करणार असल्याचे मनसेचे रविंद्र गुळादे व सुशांत कुटे यांनी सांगितले आहे.