रांजणगाव पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करायला वेळ कधी भेटेल?

क्राईम मुख्य बातम्या

अवैध्य धंदयावाल्यांनी जनतेचा मांडलाय खेळ

शिरुर (अरुणकुमार मोटे): रांजणगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या अवैध धंद्यावर अद्याप कोणतीही कारवाई रांजणगाव पोलिसांनी केलेली नाही. राजरोसपणे दारु विक्री, गुटखा विक्री, जुगार- मटका, वेश्या व्यवसाय जोरदारपणे सुरु आहे.

ट्रकच्या ट्रक गुटखा कारेगाव, रांजणगाव परिसरात खाली होत आहे. विविध पंटराच्या माध्यमातून हप्ता वसुली जोरात सुरु असल्याने कारवाई होत नसल्याचे चित्र पहावयास मिळत असल्याचे नागरीक सांगत आहे. अवैध धंदा करायचा असल्यास रांजणगाव, कारेगाव परीसरात या व बिनधास्त अवैध्य व्यवसाय सुरु करा, अशी योजनाच रांजणगाव पोलिसांनी काढल्याची चर्चा परीसरातील नागरिक करत आहे.

रांजणगाव पोलिसांना प्लेसमेंट वाल्यांकडून मोठा हप्ता जात असल्याची चर्चा असून त्यांच्या विरोधात कामगारांची तक्रार दाखल करुन घेतली जात नाही. तसेच काही महीन्यापुर्वी फियाट कंपनीमध्ये दोन कामगारांचा चेंबरमध्ये बुडून मृत्यू झाला होता. कंपनी प्रशासना विरोधात सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांनी आवाज उठवूनही सदोष्य मनुष्यवधाचा गुन्हा तपास आधिकारी विनोद शिंदे यांनी अद्यापपर्यंत दाखल केलेला नाही.

आर्थिक तडजोडीमुळे व त्यांच्या खाजगी गाडीचा वापर पोलिसांकडून होत असल्याने कंपनी प्रशासनाच्या दावणीला हे आधिकारी बांधलेले गेले असल्याने सर्वसामान्य व्यक्तींना रांजणगाव पोलिस स्टेशनला न्याय भेटणे अवघड झाले आहे…

(क्रमशः)