आपल्याच माणसांची कौतुकाची थाप ही काम करण्याची ऊर्जा देते; किरण पिंगळे 

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती: जेव्हा आपल्याच माणसांची कौतुकाची थाप पाठीवर पडते त्यावेळेस खुप खुप आनंद होतो. माझी आई माझी प्रेरणा आहे. माझे वडील लहानपणीच वारले पण मला आईने कधीच वडिलांची उणीव भासून दिली नाही. आज माझे वडील असते तर त्यांना खुप आनंद झाला असता. तुम्ही माझा सत्कार केला त्यामुळे मला अजुन काम करण्याची ऊर्जा मिळाली. माझ्या या यशात “शिरुर तालुका डॉट कॉम” च्या टिमचा तसेच सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर यांचा खुप मोठा वाटा असुन त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहचू शकले असे प्रतिपादन किरण पिंगळे यांनी केले.

रांजणगाव गणपती येथील देवाचीवाडी दुर्गामाता नवरात्र उत्सव मंडळाने नवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या जागर आदिशक्तीचा सन्मान स्त्रीशक्तीचा या कार्यक्रमा अंतर्गत “शिरुर तालुका डॉट कॉम” च्या उपसंपादक किरण पिंगळे यांचा मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महिलावर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होता. यावेळी नुकतीच ???????? ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या संतोष जयसिंग लवांडे याचाही मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

देवाचीवाडी येथे १९ वर्षापासुन हा नवरात्र उत्सव चालू असुन रोज मान्यवरांच्या हस्ते देवीची आरती केली जाते. प्रत्येकवर्षी लहान मुलांसाठी विविध खेळ, तसेच महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन मंडळाकडून केले जाते.नवरात्र उत्सवाच्या सातव्या दिवशी महिलांसाठी रामेश्वर ढाकणे प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ मानाच्या पैठणीचा हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. त्यामध्ये प्रथम क्रमांकास मानाची पैठणी दुसऱ्या क्रमांकास टेबल फॅन तिसऱ्या क्रमांकास मिक्सर अशी बक्षिसे होती. प्रथम क्रमांकाची मानाची पैठणी कु.सुहानी अनिल खेडकर हिला मिळाली. कार्यक्रमास आलेल्या पाहुण्यांचे स्वागत नंदकुमार शेळके यांनी तर आभार मंडळाचे अध्यक्ष शरद गदादे यांनी मानले.