शिरुर तालुक्यातील युवक रील्स बनवायला गेले अन जेल मध्ये अडकले…

क्राईम मुख्य बातम्या

शिक्रापुरात तलवार, कोयत्यासह दोघे ताब्यात व तिघांवर गुन्हे

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे सोशल मीडियावर हातात तलवार व कोयता दाखवून रील्स बनवून दहशत निर्माण करणाऱ्या तिघा युवकांना शिक्रापूर पोलिसांनी तलवार व कोयत्या सह ताब्यात घेतल्या असून ओंकार उर्फ पांडा बाळासाहेब कुंभार, दुर्वांश शिवाजी क्षेत्री, दिलावर सुभान शेख या तिघांवर गुन्हे दाखल केले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर हद्दीमधील सोशल मिडीया फेसबुक, इंस्टाग्रामची माहिती घेत असताना शिक्रापूर येथील महाबळेश्वरनगर मध्ये तीन युवक सोशल मिडीयावर दहशत पसरविण्यासाठी हातात कोयता व तलवार घेवुन रस्त्यावर फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांना मिळाली.

त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, शिवाजी चितारे, पोलीस नाईक मिलिंद देवरे, अमोल नलगे, जयराज देवकर, रोहीदास पारखे, विकास पाटील, निखील रावडे, किशोर शिवणकर, लखन शिरसकर यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तिघे युवक दिसून आले मात्र पोलिसांची चाहूल लागताच एक युवक हातातील कोयता टाकून पळून गेला. दरम्यान पोलिसांच्या पथकाने ओंकार उर्फ पांडा कुंभार व दुर्वांश क्षेत्री या दोघांना तलवार व कोयत्या सह ताब्यात घेतले तर दिलावर शेख पळून जाण्यात यशस्वी झाला. यावेळी पोलिसांनी कोयता व तलवार जप्त केले.

याबाबत पोलीस शिपाई जयराज वसंत देवकर रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी ओंकार उर्फ पांडा बाळासाहेब कुंभार (वय २३), दुर्वांश शिवाजी क्षेत्री (वय २३) व दिलावर सुभान शेख तिघे रा. महाबळेश्वरनगर शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे या तिघांवर भारतीय हत्यार अधिनियम कायद्यानुसार गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने हे करत आहे.

शिकापुर हद्दीमध्ये लोकांमध्ये भिती, दहशत पसरविणेकरीता अथवा सोशल मिडीयामध्ये लाईक व कॉमेट मिळणेकरीता कोयता तलवारीसह रिल बनवणाऱ्या तसेच वाढदिवस साजरा करताना केक कापण्यासाठी तलवार अथवा हत्यारांचा वापर करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार असून सोशल मिडीयावर बारकाईने लक्ष असणार असल्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी सांगितले आहे.