उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी घरगुती उपाय

आरोग्य

उच्च रक्तदाब हा आधुनिक युगात वाढत चाललेला आजार आहे. यावर प्रभावी औषध उपचार उपलब्ध आहेत. परंतु ही औषधे आयुष्यभर घ्यावी लागतात. त्याचे साईड इफेक्ट सहन करावे लागतात. काही घरगुती उपाय रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. या उपायांमुळे औषधांचा डोस कमी ठेवण्यास मदत होऊ शकते. यासाठी डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा आहे. स्वतः औषधे बंद करु नयेत किंवा डोस कमी करू नये.

१) उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी दररोज अर्धा ते पाऊण तास चालण्याचा व्यायाम करावा. काही महिन्यात रक्तदाब नॉर्मल होतो. हा लॉंग टर्म बेनेफिट आहे. रोज दहा मिनिटे हिरवळीवर अनवाणी चालावे. याचाही फायदा होतो.

२) रक्तदाब नॉर्मल करण्यासाठी कारले फायदेशीर आहे. कारल्याची भाजी कडू असल्याने अनेकांना आवडत नाही. थोडा गूळ घालावा, म्हणजे छान लागते. कारल्याच्या पातळ चकत्या करून तव्यावर भाजा. कुरकुरीत होतात आणि छान लागतात.

३) चार पाच तुळशीची पाने आणि दोन तीन कडुलिंबाची पाने कुस्करुन त्यात एक ग्लास पाणी घालावे. सकाळी रिकाम्या पोटी प्यावे.

४) प्रत्येक घरात लसूण वापरला जातो. उच्च रक्तदाब लसणाच्या वापराने नियंत्रित केला जाऊ शकतो. रोज दोन तीन पाकळ्या लसूण जेवणाबरोबर खावा. लसणामुळे काही जणांचे पित्त वाढू शकते, याची काळजी घ्यावी.

५) उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी तुम्ही नारळाचा वापर करू शकता. दिवसातून दोन वेळा नारळाचे पाणी प्या. यामुळे उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

६) रोज एक टोमॅटो खावा, किंवा एक कप टोमॅटोचा रस प्यावा. तसेच एक डाळिंब किंवा डाळिंबाचा रस प्यावा. डाळिंबामुळे पित्त कमी होते.

७) तुम्ही टरबूजाच्या बिया आणि खसखस याचा वापर करू शकता. या दोन गोष्टी बारीक करून घ्या. दोन वेगळ्या डब्यात भरून ठेवा. दोन्ही दररोज एक एक चमचा घ्या.

८) एक चमचा आवळ्याचा रस आणि एक चमचा मध एकत्र करा. दिवसातून दोन वेळा घ्या.

९) बीटरुट आणि मुळा उच्च रक्तदाबासाठी उपयोगी आहे. एक बीटरुट आणि मुळा घ्या. त्याचे लहान तुकडे करा. मिक्सरमध्ये टाकून रस काढा. हा रस दिवसातून एकदा प्या.

(सोशल मीडियावरुन साभार)