पिंपरी दुमालाचे ग्रामपंचायत सदस्य शरद खळदकर याचं सदस्यत्व कायम

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पिंपरी दुमाला गावचे ग्रामपंचायत सदस्य शरद नानाभाऊ खळदकर हे सन 2021 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग या जागेवर निवडून आले होते. त्यांच्या विरोधात निवडणूकीत पराभूत झालेले उमेदवार प्रमोद रविंद्र खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे खळदकर यांनी जातपडताळणी प्रमाणपत्र वेळेत दाखल न केल्यामुळे शरद खळदकर यांचे सदस्यपद रद्द व्हावे म्हणून तक्रार अर्ज दाखल केला होता. परंतु शरद खळदकर यांना राज्यपालांच्या अध्यादेशामुळे दिलासा मिळाला असुन त्यांचे सदस्यपद कायम राहिले आहे.

याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे 18 जानेवारी 2021रोजी शरद खळदकर हे पिंपरी दुमाला ग्रामपंचायतच्या सदस्यपदी निवडुन आले. त्यानंतर त्यांच्याविरोधात पराभूत झालेले उमेदवार प्रमोद खेडकर यांनी खळदकर यांनी जातपडताळणी प्रमाणपत्र वेळेत दाखल न केल्यामुळे शरद खळदकर यांचे सदस्यपद रद्द व्हावे म्हणून पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर पुणे जिल्हाधिकारी यांनी शरद नानाभाऊ खळदकर यांनां दि.२५ एप्रिल २०२३ रोजी सदस्यपदी अपात्र केले.

त्यानंतर भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा अध्यक्ष जयेश शिंदे यांनी याप्रकरणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपुर्ण राज्यात 14 हजार ग्रामपंचायतीमधील 7 हजार सदस्य वेळेत जात पडताळणी प्रमाणपत्र न दिल्यामुळे अपात्र होण्याची शक्यता असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनात आणुन दिले आणि याबाबत मुदतवाढ देण्यासाठी लेखी निवेदन दिले. त्यानंतर २८ जुन २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळाने १ जानेवारी २०२१ नंतर झालेल्या निवडणूकांसाठी जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी १ वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांनी याबाबत १० जुलै २०२३ रोजी अध्यादेश पारीत केला.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या त्या अध्यादेशामुळे शरद नानाभाऊ खळदकर हे पिंपरी दुमाला गावच्या सदस्यपदी पुन्हा पात्र झाले आहेत. त्यानंतर बोलताना खळदकर म्हणाले पिंपरी दुमाला गावच्या सर्वांगीण विकासासाठी जानेवारी 2021 पासुन मनापासून प्रयत्न केला आहे. तसाच प्रयत्न यापुढील काळातही राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत राहनार असल्याचे त्यांनी सांगितले.

कारेगाव ग्रामपंचायतच्या अजब गावकारभाऱ्यांचा गजब कारभार…

शिक्रापूर ग्रामपंचायतचे राजकारण वेगळ्या वळणावर

शिरुर तालुक्यातील त्या ग्रामपंचायत मध्ये रंगतोय अपात्रतेचा खेळ