Misal

शिरूर तालुक्यात झणझणीत मिसळ कोठे मिळते बरं?

खव्वयेगिरी

शिरूरः मिसळ म्हटली की कोणाच्या तोंडाला पाणी सुटत नाही बरं? महाराष्ट्रीयन मिसळ पाव हा सर्वांच्या आवडीचा एक पदार्थ आहे. आपण अनेकदा हॉटेलमध्ये मिसळ पाव खातो. मिसळ आवडली की अनेकांना तेथे खाण्याचा सल्ला देतो. मग त्या हॉटेलची प्रसिद्धी आपोआपच होते. कारण, ती मिसळच असते मुळात दर्जेदार.

मिसळ म्हणजे नुसती तर्री…
आहाहा मिळस पाहूनच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. पणे, कोल्हापूर, नाशिक, सातारा, सांगली किंवा सोलापुरी मिसळ प्रसिद्ध आहेत. गरम गरम लाल भडक वाफा येणारा झणझणीत सँपल बघीतला तरी डोळ्यातून नाकातून पाणी यायला पाहिजे. मिसळ चांगली कोणती या वरून अनेक वाद आहेत. मिसळप्रेमींची संख्या महाराष्ट्रात काही कमी नाही. कितीही ठिकाणची मिसळ खाऊन पाहिली, तरी पुण्याची, शिरूरची मिसळ खाल्ल्या शिवाय मन तृप्त होत नाही. विविध हॉटेलमध्ये कॉम्बिनेशनच्या मिसळींचा आस्वाद वेगवेगळा असतो.

शिरूर तालुक्यातही विविध हॉटेल असून, त्यामधील मिसळ एकदम प्रसिद्ध आहेत. पण, तुम्हाला कोणत्या हॉटेलमधील मिसळ आवडते ते प्रतिक्रियांच्या माध्यमातून जरूर कळवा….

1 thought on “शिरूर तालुक्यात झणझणीत मिसळ कोठे मिळते बरं?

Comments are closed.