शिवजयंती निमित्त शिवभक्तांना राज्य सरकारकडून अनोखी भेट

महाराष्ट्र

शिवनेरी मार्गावरील तीन टोलवर टोलमाफी…

औरंगाबाद: शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं शिवभक्तांनी टोलमाफ करण्याचा निर्णय घेतला असून 19 फेब्रुवारीला शिवनेरीवर जाणाऱ्या शिवभक्तांना टोलमाफ करण्यात आला आहे. शिवनेरी किल्ल्याच्या मार्गावरील तीन टोलवर टोलमाफी करण्यात आली आहे. यामध्ये खालापूर, तळेगाव, खेड, राजगुरुनगर टोलनाक्यावर टोलमाफी असेल सरकारकडून घोषित करण्यात आलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा 393 वी जयंती साजरी होत आहे. त्याचबरोबर यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्राची ओळख जगभरात पोहोचली आहे. त्यांनी स्वराज्य रक्षणासाठी उभारलेले गड-किल्ले जगभरातील पर्यटनप्रेमींचे मुख्य आकर्षण आहे. यात शिवनेरी, रायगड आणि सिंधुदुर्ग हे महत्वाचे किल्ले आहेत.

तीन दिवस चालणारे कार्यक्रम पुढीलप्रमाणे…

18 फेब्रुवारी 2023

सायंकाळी 6.30 वाजेपर्यत हिंदवी स्वराज्य महोत्सव 2023 उदघाटन

सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यत सुप्रसिद्ध दिग्दर्शक अशोक हांडे यांचा ‘मराठी बाणा’ कार्यक्रम.

19 फेब्रुवारी 2023

सकाळी 9 ते 11 वाजेपर्यत किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा

दुपारी 3 ते 5 वाजेपर्यत शिववंदना

सायंकाळी 6.15 ते 7 वाजेपर्यत महाआरती कार्यक्रम

सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यत जाणता राजा या महानाट्याचा कार्यक्रम

20 फेब्रुवारी 2023

सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यत जाणता राजा कार्यक्रम

तीनही दिवशी विविध बचतगटांची उत्पादने आणि खाद्यपदार्थांच्या 300 स्टॉलचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.