मणिपूर महिला अत्याचार विरोधात मौन निषेध राष्ट्रवादी काँग्रेसच आंदोलन

महाराष्ट्र

मुंबई: मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार होत आहे. महिलांवर झालेल्या अत्याचाराविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभर मौन निषेध आंदोलन करण्यात आले आहे. मुंबई विभागातील मंत्रालया जवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रमुख उपस्थित होते.

मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार होत आहे तसेच महिलांवर अत्याचारी मोठ्या प्रमाणात होत आहेत या अत्याचाराविरोधात आज मुंबई विभाग राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंबईतील 6 जिल्ह्यांमध्ये मौन निषेध आंदोलन करण्यात आले आहे. मंत्रालया जवळी महात्मा गांधी यांच्या पुतळा जवळ आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मुंबई कार्याध्यक्षा राखी जाधव तसेच ओबीसी चे अध्यक्ष राजा राजपूतकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

मणिपूर तीन महिन्यापासून जळत आहे. पण देशाच्या पंतप्रधानांना लक्ष द्यायला वेळ नाही. मणिपूरमध्ये महिलेची निर्वस्त्र धिंड काढून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा व्हिडिओ पाहून मन सुन्न झाले. ही घटना एका महिलेपुरती मर्यादीत नसून हा समस्त महिला वर्गावरचा अत्याचार आहे.

मणिपूरमधील परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून राज्य सरकार व केंद्र सरकारला परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले नाही. त्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मौन निषेध आंदोलन मुंबईतील सहा जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आले होते. दक्षिण मुंबई, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर, ईशान्य मुंबई या वेगवेगळ्या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले आहे. या जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.