ncp logo

शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराची राष्ट्रवादीकडून घोषणा…

महाराष्ट्र राजकीय

पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून तर शिरुर लोकसभा मतदारसंघातून मधून खासदार डॉ. अमोल कोल्हे हे उमेदवार असतील, अशी घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (शरद पवार गट) जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या पदवाटप कार्यक्रमानंतर पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. जयंत पाटील म्हणाले, ‘जागावाटपाबाबत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांशी चर्चा करून उमेदवारी जाहीर करण्यात येईल. मात्र ज्या ठिकाणी विद्यमान खासदार हे आमच्या पक्षाचे आहेत तेथील उमेदवार हे आमच्या पक्षाचे असतील. बाकी जागेवरील उमेदवार मी जाहीर करणे सोयीचे नाही. शिवसेनेचे आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणी सुरू होणार आहे. ही सुनावणी ऑनलाइन घ्यावी, अशी मागणी होत आहे, आमची सुध्दा सुनावणी ऑनलाइन घेण्याची मागणी आहे. ऑनलाइन सुनावणी झाली तर बरे होईल विधानसभा अध्यक्षांवर आक्षेप घेता येणार नाही. दोन्ही बाजू कळतील, तसेच विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेणे सोपे होईल.’

राज्यावर दुष्काळाचे सावट आहे, मात्र हे सरकार फारशी हालचाल करताना दिसत नाही. दुष्काळ निवारणासाठी प्रत्यक्ष कार्यवाही होईल, असे वाटत नाही. अनेक धरणात कमी पाणीसाठा आहे. पुढचे वर्ष कसे काढायचे हे आव्हान आहे. सरकारकडून दुष्काळ निवारणार्थ नियोजन बैठक अथवा निर्णय होताना दिसत नाही. शेतकरी हवालदिल झालेला आहे. दुबार पेरणीचे संकट आहे, मात्र सरकार इव्हेंटमध्ये गुंतली आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

अजित पवार यांना धक्का! डॉ. अमोल कोल्हे यांचे ट्विट आले चर्चेत…

हा पुरस्कार माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या तमाम मायबाप मतदारांचा; डॉ. अमोल कोल्हे

महापुरुषांचा अवमान होऊ नये म्हणून कायदा करावा; डॉ. अमोल कोल्हे

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश, रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात

शिरुर लोकसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाचा दावा…

लोकसभा, विधानसभेची प्रत्येक जागा जिंकण्याच्या उद्देशाने काम करा; नाना पटोले

लोकसभा निवडणुकीत भाजपमुक्त महाराष्ट्र करण्याचा काँग्रेसचा निर्धार