आण्णापूरमध्ये शासन आपल्या दारी अभियान, नागरीकांनी योजनांचा लाभ घेण्याचे नायब तहसिलदार यांचे आवाहन

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील आण्णापूर, निमगाव भोगी, मलठण, आमदाबाद, रामलिंग, सरदवाडी, कर्डिलवाडी या गावांसाठी एकत्रीतपणे तहसिल प्रशासनाच्या सहकार्यातून व सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांच्या पाठपुराव्यातून ‘शासण आपल्या दारी ‘ या उपक्रमातून विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभामंडप, मौजे आण्णापूर या गावात बुधवार (दि. ७) रोजी विविध विभागांच्या योजनेचा लाभ नागरीकांना मिळणार आहे.

१ )निराधार वयोवृद्ध विधवा यांस मासिक पेन्शन योजना,

२ ) निराधार बालक पेन्शन योजना

३) रेशनकार्ड संबंधित कामे ४) अपंग दिव्यांग संबंधित योजना

५) प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना

६) उत्पन्नाचे व इतर दाखले तसेच सेतु कार्यालय संबंधित कामे

७) आधारकार्ड संबंधित कामे ८) टपाल (पोस्ट) खात्याच्या विविध योजना

९) कृषी विभागासंबंधी योजना

१०) पंचायत समिती संबंधित विविध योजना

१९) महावितरण संबंधित योजना

१२) गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमीत व बंद झालेले नाडी रस्ते / पाणंद / शेतरस्ते

शेतावर जाण्याचे पायमार्ग मोकळे करणे.

१३) एका महिन्याच्यावर प्रलंबित असणारे फेरफार निकाली काढणे,

१४) अर्धन्यायिक प्रकरणे निर्गत करणे,

१५) भूमी अभिलेख (मोजणी कार्यलय) संबंधित कामे. १६) आरोग्य विभागाच्या योजना

१७) वन विभाग संबंधित कामे

१८) मतदार नोंदणी व मतदान कार्ड संबंधित कामे या ठिकाणी होणार आहे. सर्व विभाग एकाच छताखाली येणार असून नागरीकांची विविध कामे या ठिकाणी मार्गी लागणार असल्याने नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन निलेश वाळुंज व तहसिलदार शिरुर यांनी केले आहे.