शिक्रापूर (शेरखान शेख): टाकळी भीमा (ता. शिरुर) या गावातील शासनाच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी 4 कोटी 99 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य नितीन वडघुले यांनी दिली आहे.
टाकळी भिमा (ता. शिरुर) गावातील जलजीवन मिशन अंतर्गत निधी देण्याची मागणी शासकीय पातळीवर करण्यात येत असताना शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नातून शासनाकडून जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी 4 कोटी 99 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने गावातील पाणी प्रश्न सुटणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून सदर योजनेमुळे गावातील प्रत्येक वाड्या वस्त्यांवर घरोघरी नळ जोडणी करुन घरोघरी पाणी मिळणार असल्याने महिला वर्गात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत बोलताना सदर योजनेसाठी आम्ही पाठपुरावा करत होतो. त्याला यश आलेले असून गावातील अन्य सुविधांसाठी देखील आम्ही संबंधित विभागांशी पाठपुरावा करत असून यासाठी देवीदास करपे, ग्रामविकास अधिकारी रवींद्र शिंदे, सरपंच कोमल माहुलकर, उपसरपंच सविता घोलप, ग्रामपंचायत सदस्य सुमन वडघुले, सुनंदा काळे, रेणुका गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे देखील नितीन वडघुले यांनी सांगितले आहे.