मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीस उपस्थित रहावे

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळी होणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्याची मागणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव दादा, जुन्नर चे माजी आमदार शरद सोनवणे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मूर्ती समितीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, शांताराम भंडारे, सचिन भंडारे, अनिल भंडारे, राहुल भंडारे, समितीचे विश्वस्त अनिल काशीद, हरिभाऊ भंडारे, शिक्रापूरचे माजी आदर्श सरपंच रामभाऊ सासवडे यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या २१ मार्च २०२३ रोजी होणाऱ्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची विनंती करत निवेदन देण्यात आले तर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या विकास आराखड्यासाठी शासनाकडून भरघोस निधी मिळावा व धर्मवीर संभाजी महाराजांचा विकास आराखडा तयार करताना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृति समितीसह सर्व ग्रामस्थांना विचारात घेऊन आराखडा तयार करावा.

तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे नावापुढे धर्मवीर शब्द वापरुन संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक या शब्दाचा विशेषण न वापरता धर्मवीर या शब्दानेच विशेषणाचे प्रयोजन करण्यात यावे, याच मागण्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आले असून मुख्यमंत्री यांनी त्या सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे देखील धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.