महाराष्ट्राच्या अस्मिता व थोर पुरुषांविरोधात बोललेल आम्ही सहन करणार नाही…

शिरूर तालुका

वढू बुद्रुक मध्ये आमदार रोहित पवारांचे अन्य आमदारांसोबत आत्मक्लेश

शिक्रापूर (शेरखान शेख): गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या अस्मिते विरोधात व महापुरुषांच्या विरोधात अपप्रचार केला जात असून शेकडो वर्षाच्या परंपरेला तडा दिला जात आहे. त्याला विरोध करण्यासाठी आम्ही एकत्र आलो असून येत्या काळात महाराष्ट्राच्या अस्मितेविरोधात तसेच थोर पुरुषांविरोधात कुणीही बोललो तर आम्ही नागरिक म्हणून शांत बसणार नाही, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.

श्री. क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळी आज आमदार रोहित पवार यांसह अन्य आमदारांनी आत्मक्लेश आंदोलन केले. यावेळी आमदार अशोक पवार, सुनील टिंगरे, संदीप क्षिरसागर, अमोल मित्कारी जयदेव गायकवाड, अतुल बेनके, प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार, सविता बगाटे, सरपंच सारिका शिवले, चेअरमन प्रफुल्ल शिवले, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर, राष्ट्रवाडीच्या नेत्या रुपाली ठोंबरे, डॉ. वर्षा शिवले, राष्ट्रवाडी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश संघटक जावेद इनामदार, कात्रज दुध संघाचे संचालक स्वप्नील ढमढेरे, ज्ञानेश्वर थेऊरकर, नितीन पवार, विश्वास ढमढेरे, यशवंत माने, दिलीप वाल्हेकर यांसह आदी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शाहीर राजेंद्र कांबळे यांनी थोर पुरुषांबाबत पोवाडे सादर केले.

दरम्यान आत्मक्लेश नंतर बोलताना आम्ही कोणी पदाधिकारी म्हणून नाहीतर एक स्वाभिमानी नागरिक म्हणून येथे उपस्थित राहिलो, समाधीचे दर्शन घेऊन येथे उपस्थित असलेल्या स्वाभिमानी नागरिकांसह आत्मक्लेश आंदोलन केले असून हे ठिकाण निवडण्याचे मुख्य कारण म्हणजे छत्रपती संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताचे असले तरी ते विचारांचे वंशज होते.

स्वराज्याचा तसेच सामाजिक लोकांचा तसेच रयतेचा विचार त्यांनी स्वतः आत्मसात केला मोठ्या शक्तींच्या विरोधात ते उभे ठाकले, तसेच त्यांना झुकवण्याचा आणि त्यांच्या विचारावर घाला घालण्याचा प्रयत्न बलाढ्य शक्तीने केला मात्र लोकांसाठी ते कधी झुकले नाही हा संदेश घेऊन पुढची ताकद कितीही मोठी असली तरी त्यासमोर झुकायचे नाही हा विचार घेऊन आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

खासदार अमोल कोल्हेंच्या गैरहजेरीची चर्चा…

वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे राष्ट्रवादीच्या 7 ते 8 आमदारांनी एकत्र येत आत्मक्लेश आंदोलन केले मात्र यावेळी सदर लोकसभा मतदार संघाचे खासदार असलेले तसेच छत्रपतींचा इतिहास जगासमोर मांडणारे खासदार डॉ. अमोल कोल्हे मात्र यावेळी गैरहजर असल्याची चांगलीच चर्चा रंगली. मात्र याबाबत बोलताना अमोल कोल्हे हे महाराजांची बाजू मांडत असतात. परंतु (दि. 3) रोजी अचानकपणे सर्वजण एकत्र आलो होतो ते देखील आमच्या सोबत असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.