शिक्रापुरात प्लास्टिक रिंग अडकलेल्या मांढूळाची सुटका

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील विक्की मांढरे यांच्या घरालगत एक मांढूळा जातीचा साप अंगात रबरसारखे काहीतरी अडकलेल्या स्थितीत युवकांना दिसून आला. याबाबतची माहिती इंडिया बुक रेकॉर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख यांना मिळताच शेरखान शेख, अमोल कुसाळकर, आकाश सुर्वे यांनी सदर ठिकाणी धाव घेत पाहणी केली असता एका मांढूळ जातीच्या सापाच्या मानेतून पुढे काही अंतरावर प्लास्टिकची कडक रिंग अडकल्याचे दिसून आले.

दरम्यान सर्पमित्रांनी सदर सापाला ताब्यात घेत त्याच्या अंगात अडकलेली प्लास्टिकची रिंग काढून सापाबाबतची माहिती शिरुर वनविभागाच्या वनपाल गौरी हिंगणे, वनरक्षक प्रमोद पाटील यांना माहिती देत सापाची निसर्गाच्या सानिध्यात मुक्तता केली, तर यावेळी बोलताना 2 दिवसांपूर्वी सणसवाडी येथील भक्ती हॉस्पिटल मध्ये उंदीर पकडण्यासाठी लावलेल्या पॅड वर अडकलेल्या नागाची देखील सुटका करुन निसर्गात मुक्त करण्यात आले असल्याचे इंडिया बुक रेकॉर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख यांनी सांगितले.