शिक्रापूरच्या वेळ नदीवरील बंधाऱ्याचे ढापे चोरी

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर ता. शिरुर येथील वेळ नदीवर बांधलेल्या बंधाऱ्याच्या माध्यमातून पाणी अडवून ठेवण्यासाठी ग्रामपंचायतने लोखंडी ढापे बनवलेले असून सदर ढापे नदीच्या कडेलाच काढून ठेवलेले होते. 1५ डिसेंबर २०२२ रोजी ग्रामपंचायत कर्मचारी नदीजवळ गेले असता त्यांना सदर ठिकाणी ढापे दिसले नाही.

त्यामुळे त्यांनी ग्रामविकास अधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर सदर ढापे चोरीला गेल्याचे समोर आल्याने ६ जानेवारी २०२३ रोजी शिक्रापूर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी शिवाजी वामन शिंदे (वय ४५) रा. मांजरी बुद्रुक ता. हवेली जि. पुणे मूळ रा. काळशी ता. इंदापूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर हे करत आहे.