Leader

बेट भागात ZP, पंचायत समितीसाठी इच्छुकांची मांदीयाळी; राष्ट्रवादीकडून तिकीट कोणाला…

मुख्य बातम्या

सविंदणे (अरूणकुमार मोटे): बेट भागात जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य पदाच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची मांदीयाळी असून, राष्ट्रवादीकडून तिकीट कोणाला मिळणार? याकडे बेट भागाचे लक्ष लागले आहे.

बेट भागात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निकालानंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यत पोहचण्याचे प्रयत्न अनेक दिवसांपासून चालू आहे. टाकळी हाजी व इतर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एकहाती सत्ता मिळवलेले दामूशेठ घोडे, माजी आमदार पोपटराव गावडे यांचे सुपुत्र राजेंद्र गावडे , शेतकरी संघटनेचे माऊली ढोमे, शिवसेनेचे डॉ. सुभाष पोकळे, गणेश जामदार, भाजपाचे सावित्रा थोरात हे सर्व जण जिल्हा परीषद सदस्यपदाच्या उमेदवारीसाठी सज्ज आहेत.

कवठे येमाई पंचायत समिती गणामध्ये उमेदवारी पदासाठी इच्छुकांची गर्दी…
कवठे येमाई गणामध्ये पंचायत समिती सदस्य पदासाठी वसंत पडवळ, भाऊसाहेब लंघे, बाळासाहेब डांगे, नाना फुलसुंदर, दिपक रत्नपारखी, सागरआप्पा दंडवते, रामभाऊ गायकवाड हे इच्छुक उमेदवार उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. पक्षश्रेष्ठीकंडे विविध विकास कामांमधून तिकिटासाठी फिल्डींग लावत आहे.

टाकळी हाजी गणातून…
बिपिन थिटे व राष्ट्रवादीच्या गावडे व घोडे गटाकडून आपआपल्या भावी उमेदवारावर दबाव नये म्हणून नावे गुपित ठेवली जात आहे.

राष्ट्रवादी पक्षाकडून जिल्हा परीषद व पंचायत समिती पदासाठी अनेक जण इच्छुक असल्याने तसेच टाकळी हाजी भागात राष्ट्रवादीमध्ये गावडे गटाविरूद्ध घोडे गट तयार झाल्याने कोणाला तिकिट दयावे, याबाबत पक्षातील वरीष्ठांची डोकेदुखी वाढणार आहे. तिकीट न मिळाल्यास नाराज गट कोणाला मदत करणार की स्वबळावर लढणार? हे येणारा काळच ठरवणार आहे.