शिरूर (संपत कारकूड) : रेशन वाटपासाठी वापरल्या जाण्याऱ्या वितरण प्रणालीचा सर्वर २० तारखेपासून डाऊन झाल्यामुळे शिरूर तालुक्यातील सर्वच धान्य वितरण व्यवस्था कोलमडून पडली आहे. नागरिकांना चालू महिण्याच्या शिधा अद्याप मिळालेला नाही.
शिरूर तालुकाभर प्रत्येक महिन्याची वाटपासाठी दुकानदारांकडून आपापल्या सोईने तालुका पुरवठा विभागाकडून धान्य उचल होत असते. तसेच उचल धान्य वाटपही आपल्या सोईने केले जाते. ज्यांनी लवकर धान्य आणले आणि लगेच वाटप चालू केले त्या ठिकाणी मात्र धान्य मिळाले आहे. परंतु, धान्य महिन्याच्या शेवटच्या तारखेला वाटप करू आशा दुकानदारांचा मात्र आधीच उल्लास आणि त्यात फाल्गुन मास, अशी अवस्था झाली आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यात पूर आला होता. त्या काळात गोरगरीबांच्या हाताला कोणतेही काम नाही. नदीला आलेल्या पुरामुळे कांही गावात पाणी शिरलेले होते. अनेक कुटुंबाना या पावसाचा व पुराचा फटका बसलेले असताना याच महिन्यात स्वस्त धान्य वाटपातील या अडचणीला सामोरे जाण्याची वेळ लाभार्थी यांच्यावर आली आहे. या परस्तिथीत या महिन्याकरिता तरी ऑफ लाईन धान्य वाटपासाठी मागणी होत आहे. ती मागणी पूर्ण होणार का? नागरिकांना वाटप उशीर मिळणार? हे पाहावे लागणार आहे.
आम्ही काही करू शकत नाही : सतीश पंचरास
महिना संपला तरी धान्य वाटप का नाही? असा प्रश्न आमच्या प्रतिनिधीने शिरूरचा पुरवठा अधिकार पंचरास यांना केला असता, आम्ही या मध्ये काय करू शकत नाही. वाटप ऑफ लाईन करणे हा निर्णय वरिष्ठ अधिकारी घेतात. वाटप तात्काळ करण्यासाठी शिरूर पुरवठा वेट अँड वॉच ची भूमिका घेत असून नागरिकांना धान्य केव्हा मिळणार हे त्यांनाही सांगता आले नाही.
शिरुर तहसिलकडून नवीन रेशनकार्डसाठी नागरीक वेठीस; रेशनिंगच्या धान्याचाही होतोय काळाबाजार
शिरूर तालुक्यात होतोय रेशनचा मोठा काळाबाजार…
शिरुर तालुक्यात दिव्यांगाना रेशनच धान्य मिळेना, मनमानी कारभार सुरु…
शिरूर तालुक्यात महिना संपला तरी रेशन धान्य वाटप नाही; भ्रष्टाचार…