वाघाळेः वाघाळे (ता. शिरूर) येथून प्रथमच दिंडी निघाली असून, श्री वाघेश्वर पायी दिंडीचे रविवारी (ता. ११) पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
वाघाळे येथे श्री वाघेश्वर दिंडीची पुजा झाल्यानंतर वाजत-गाजत टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान झाले. वाघेश्वर दिंडीने आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये सहभागी होऊन पुढे पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे.
वाघाळे गावातून प्रथमच दिंडी निघाली असून, ६०हून अधिक वारकरी या दिंडीत सहभागी झाले आहेत. दिंडीच्या प्रस्थानावेळी विकास सोसायटीचे चेअरमन सुर्यकांत बढे, उद्योजक लहू थोरात, राजेंद्र भोसले, सुरेश थोरात यांच्या हस्ते आरती करण्यात आली. पांडुरंगाच्या मुर्तीचे पुजन हभप संतोष महाराज खेडकर यांनी केल्यानंतर दिंडीने प्रस्थान केले.
दरम्यान, हभप अर्जुन बढे, हभप पोपट थोरात, हभप सुभाष पवार, हभप बाळासाहेब बढे, संदीप धायबर, गोटीराम काटे यांनी दिंडीचे आयोजन केले आहे.