मानसिक व शारीरिक विकासासाठी खेळ आवश्यक; दादा देवकाते

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): विद्यार्थ्यांच्या मानसिक शारीरिक विकासासाठी खेळ आवश्यक असून त्यासाठी शालेय स्तरावरून विद्यार्थ्यांच्या खेळांसाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिरुर तालुका क्रीडा अधिकारी दादा देवकाते यांनी केले आहे.

पाबळ (ता. शिरुर) श्री भैरवनाथ विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने बोलताना शिरुर तालुका क्रीडा अधिकारी दादा देवकाते बोलत होते.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, शिक्षण प्रसारक मंडळ पाबळचे अध्यक्ष भगवान घोडेकर, खजिनदार सोपान जाधव, सरपंच मारुती शेळके, ग्रामपंचायत सदस्य सदस्य सचिन वाबळे, नामदेव पानसरे, शिरुर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके, सचिव मारुती कदम, शिक्षक नेते सोमनाथ भंडारे, प्राचार्य अनिल साकोरे, प्राचार्य बाळासाहेब चव्हाण, प्राचार्य अनिल शिंदे, बापूसाहेब लगड, सुभाष वेताळ, शिरूर तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष शरद दुर्गे, उपाध्यक्ष कैलासराव खंडागळे, माजी सभापती शंकर जांभळकर दादासाहेब उदमले, शुभम गावडे, रमेश गावडे, प्राचार्य अविनाश क्षीरसागर, उपप्राचार्य सुदाम पिंगळे, पर्यवेक्षक तुकाराम ताम्हाणे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना विद्यार्थ्यांच्या विकासासाठी खेळ महत्वाचे असून खेळातील प्रत्येक प्रकारामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपली कला दाखवावी तसेच खेळांसाठी शाळेनी देखील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे सांगत शिरुर तालुका क्रीडा अधिकारी दादा देवकाते यांनी प्रशालेस खेळासाठी 10 लाख रुपये अनुदान जाहीर केले त्यामुळे खेळाडूंनी जल्लोष केला.

सदर ठिकाणी तालुक्यातून मुला मुलींचे २०० पेक्षा जास्त संघांनी नोंदणी केली होती, सदर कबड्डी स्पर्धेसाठी उद्योजक संतोष पिंगळे, प्रतीक पिंगळे यांचा आदींचे सहकार्य लाभले, प्राचार्य अविनाश क्षीरसागर यांनी तालुक्यातून आलेल्या सर्व क्रीडा शिक्षकांचा सन्मान केला, तीन दिवशीय या स्पर्धेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष क्षीरसागर, कैलास खंडागळे, एकनाथ शिवेकर, एकनाथ बगाटे यांनी केले.

कबड्डी स्पर्धेचा निकाल…

१४ वर्षे मुले:- मल्लिकार्जुन विद्यालय न्हावरे , १४ वर्षे मुली – भैरवनाथ विद्यालय आलेगाव पागा.

१७ वर्षे मुले:- मल्लिकार्जुन विद्यालय न्हावरे, १७ वर्ष मुली – नागेश्वर विद्यालय निमोणे.

१९ वर्षे मुले:- वाघेश्वर विद्याधाम मांडवगण फराटा, १९ वर्ष मुली – संभाजीराजे विद्यालय जातेगाव बुद्रुक या संघांनी प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरावर खेळण्यासाठी प्रवेश मिळविला आहे. कबड्डी स्पर्धेसाठी तालुक्यातून १८५ संघ दाखल झाले होते त्यात मुलींचा सहभाग व उत्साह प्रशंसनीय होता.