ग्राहकांना वेठीस धरणारे संप बेकायदेशीर; रमेश टाकळकर

शिरूर तालुका

संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी 

शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या राज्यभरात सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला असून सदर संप बेकायदेशीर असल्याने संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या महसूल समितीचे मध्य प्रांत प्रमुख रमेश टाकळकर यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

महाराष्ट्र राज्यात सर्वत्र महसूल, शिक्षण, आरोग्य, ग्रामपंचायत यांसह आदी शासकीय विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांचा संप सुरु असून नागरिकांची शासकीय कामे रखडली असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासांचा सामना करावा लागत आहे. दैनंदिन कामात ग्राहकांना वेठीस धरणारे संप बेकायदेशीरच असल्याने शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सविनय कायदे पालनाने आपल्या मागण्या शासन दरबारी मांडाव्यात ग्राहकांना वेठीस धरुन केलेल्या संपाचे समर्थन कधीही करता येणार नाही.

शासनाने बेकायदेशीर पणे केलेल्या संपकरी कर्मचारी अधिकाऱ्यांचे वेतन कपात करुन शासकीय कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विरोधात पुकारलेले आंदोलन हे बंड समजून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या महसूल समितीचे मध्य प्रांत प्रमुख रमेश टाकळकर यांनी पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवेदन देऊन केली असून केलेल्या कार्यवाही चा अहवाल देखील देण्याची विनंती केली आहे.