शिक्रापुरात गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गुणगौरव

शिरूर तालुका

विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह तर शिक्षकांना सुवर्ण मुद्रिकांची भेट

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तब्बल त्रेचाळीस विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवल्याने सर्व गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा शालेय समिती व आधार फाउंडेशन वतीने गुणगौरव करत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, सन्मानचिन्ह तसेच शिक्षकांना सुवर्ण मुद्रिका देऊन गौरविण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा गुणगौरव नुकताच पार पडला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, सरपंच रमेश गडदे, उपसरपंच विशाल खरपुडे, माजी उपसरपंच सुभाष खैरे, रमेश थोरात, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, सारिका सासवडे, वंदना भुजबळ, उषा राऊत, मोहिनी मांढरे, शालन राऊत, शिक्षण विस्तार अधिकारी वंदना शिंदे, माजी मुख्याध्यापिका रंजना नरके, आधार फाउंडेशनच्या उपाध्यक्ष पल्लवी हिरवे, सामाजिक कार्यकर्ते तानाजी राऊत, विद्याधाम प्रशाला शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील मांढरे, मुख्याध्यापिका रतन मंडलिक, जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश गायकवाड, उपाध्यक्ष मिलिंद शिंदे, सदस्य संतोष गावडे, चंद्रकांत मांढरे, सविता शेंडे, अलका सासवडे, मनीषा गडदे, गणेश चव्हाण, वॉटर फाउंडेशन ट्रस्टचे गणेश राजापुरे, संतोष चौधरी, रोहित काळे यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शिष्यवृत्ती मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना तसेच मार्गदर्शक शिक्षकांना शालेय व्यवस्थापन समिती च्यावतीने सन्मानचिन्ह व आधार फाउंडेशनच्या वतीने स्टडी टेबल देऊन सन्मानित करण्यात आले तर व्यवस्थापन समिती सदस्या तथा ग्रामपंचायत सदस्या मोहिनी मांढरे यांच्या वतीने मार्गदर्शक शिक्षकांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले.

दरम्यान पालकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मुख्याध्यापिका रतन मंडलिक, प्राजक्ता व्यवहारे, श्रीमती अलका शिंदे, शैला सोनवणे, ज्योती जकाते, प्रज्ञा रसाळ या सर्वांना सुवर्णमुद्रिका व चांदीची मूर्ती सह आदी भेटवस्तू देत कृतज्ञता व्यक्त केली. असून या कार्यक्रम प्रसंगी वॉटर फाउंडेशन ट्रस्ट यांच्या वतीने शाळेला देण्यात आलेल्या संगणक कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली कोळपकर व वासुदेव टाकळकर यांनी केले तर संतोष गावडे यांनी आभार मानले.