waghale school

विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना स्पर्धा मधून वाव मिळावा: पाचुंदकर

शिरूर तालुका

वाघाळे: विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना स्पर्धा मधून वाव मिळावा, असे माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांनी म्हटले आहे. शुक्रवारी (ता. १८) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघाळे येथे यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धा बीट पातळी पार पडल्या. स्पर्धांचे उद्घाटन माजी जि प सदस्य श्री. पाचुंदकर यांचे शुभ हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

स्पर्धेच्या माध्यमातून मुलांच्या विविध कलागुणांना संधी मिळते ज्याप्रमाणे पिंपळे खालसा हे गाव आय पी एस अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते त्याचप्रमाणे गेले दहा वर्षापासून वाघाळे हे खो खो खेळाडूंचे गाव म्हणून ओळख निर्माण झाली आहे. वाघाळे गावातील युवकाने विणामूल्य गावातील व शेजारी गावांतील विद्यार्थ्यांना खो खो चे मार्गदर्शन केले. त्याचे फलित म्हणून जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर या गावचे खेळाडू चमकताना दिसतात, असे श्री. पाचुंदकर म्हणाले.

उद्घाटन समारंभास विस्ताराधिकारी खोडदे सर, केंद्रप्रमुख थोरात सर, शिक्षक संघाचे जिल्हा कोषाध्यक्ष माऊली पुंडे, शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष संतोष थोपटे, पदविधर संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रकाश नरवडे, जेष्ठ नेते सुर्यकांत बढे, उपसरपंच दादासाहेब सोनवणे, शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुहास काटे, मा सरपंच राजेंद्र भोसले, आनंदराव सोनवणे, जयेंद्र सोनवणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजिंक्य थोरात, उपाध्यक्ष विजय शेळके, सोसायटी सदस्य विजय शेळके व पंच म्हणून काम करण्यासाठी सरदवाडी बीट मधील माध्यमिक शाळांचे क्रीडाशिक्षक आणि सरदवाडी बीट मधुन विजयी स्पर्धकांना घेऊन आलेले शिक्षक आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिपक सरोदे यांनी केले तर आभार वाघाळे शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत गावडे यांनी मानले.