शिरुरमध्ये दरवाजाचे कुलूप तोडून दागिने व रक्कम लंपास

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर शहरातील रामलिंग रोड येथील रुद्रा कॉलनी मधील एका व्यक्तीच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिरुर शहरातील रामलिंग रोड येथील रुद्रा कॉलनी येथे राहणारे विलास घोलप हे घराला कुलूप लावून […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC त माथाडीच्या बोगस पावत्या दाखवत बेकायदेशीर पैसे वसुली सुरुच 

रांजणगाव गणपती: शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC त माथाडीच्या नावाखाली बोगस पावत्या छापुन वाहनचालकांना जबरदस्तीने दमबाजी आणि शिवीगाळ करत बेकायदेशीर पैसे वसुली करण्याचा काही लोकांचा सपाटा सुरुच असुन याबाबत “शिरुर तालुका डॉट कॉम” ने वेळोवेळी आवाज उठवला होता. त्यानंतर काही दिवस हि वसुली थांबली होती. परंतु परत आता हि टोळी सक्रिय झाली […]

अधिक वाचा..

पतीने स्वतःची किडणी पत्नीला देवूनही वाचवू शकले नाही

शिरुर (अरुणकुमार मोटे): आतापर्यंत तुम्ही बहीनीला, आईला, मुलाला, भावाला, किडणी दिल्याचे ऐकले असेल. परंतू चक्क आपल्या शिक्षक पत्नीला एका शिक्षकाने आपली किडणी देवून पत्नीधर्म निभावून पत्नीच्या प्रेमापोटी जीव वाचवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला होता. परंतू नियती पुढे कोणाचेही काही चालत नाही. किडणी देवूनही पत्नीचे दुखःद निधन झाल्याने शिरुर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. करडे (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

सणसवाडीतील कंपनीतून साडेसात लाखांचा ऐवज चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका कंपनीतून खिडकीचे गज उचकटून कंपनीतील सेन्सर सह कॉपर धातूचे साहित्य असा तब्बल 7 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. येथील) कृष्णलीला गार्डन मंगल कार्यालय शेजारील व्हीक्टोरा प्रायवेट लिमिटेड कंपनीतील सर्व […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC त नोकरीच्या नावाखाली पैसे लुबाडणाऱ्या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल; एकास अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC मधील कंपनीमध्ये सिक्युरीटीची नोकरी लावतो असे सांगत एक युवक आणि त्याच्या जवळच्या नातेवाईक मुलीकडुन पैसे घेऊन नोकरी न लावता दहा हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी साहिल सुभाष मुढाई याने फिर्याद दाखल केल्याने सागर सुरेश शेलार रा. विसापुर, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर आणि प्रविण बाप्पु गजाळे रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि. अहमदनगर […]

अधिक वाचा..
Crime

करंदीत व्यक्तीच्या घरातून दागिने व रक्कम चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील एका व्यक्तीच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. करंदी (ता. शिरुर) येथील कांतीलाल मुरकुटे हे 1 ऑक्टोबर रोजी त्यांच्या घराला कुलूप लावून त्यांच्या पुणे येथील घरी गेलेले […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये महिलेने घातला नोकरीच्या आमिषाने दहा लाखांना गंडा

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर (ता. शिरुर) येथील सुरज नगर मध्ये राहणाऱ्या युवकाला चक्क एका महिलेने नोकरीच्या आमिषाने 10 लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अरुधंती जयदीप तांबवेकर या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर येथील सुरजनगर मध्ये राहणारा नवनाथ सालके हा युवक शिक्षणानंतर नोकरीच्या शोधात असताना काही दिवसांपूर्वी नवनाथ […]

अधिक वाचा..

शिक्रापूरातून अठ्ठेचाळीस लाखांचा ऐवज चोरणारे चोवीस तासात जेरबंद

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे गोडाऊन बाहेर उभा केलेला अल्युनियमचा माल भरलेला ट्रक व ट्रक मधील मुद्देमाल असा सुमारे 48 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेणाऱ्यांना शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने 24 तासात जेरबंद केले असून सुधील गंगाधर भारती, रोहित सुधीर भारती व गजानन रामभाऊ जाधव असे शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत. […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलीस स्टेशन समोरच मंदिराची दानपेटी फोडली

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन समोरच असलेल्या मारुती मंदिरातील दानपेटी फोडून चोरटयांनी त्यातील रक्कम लंपास केल्याची घटना घडली असून घडलेल्या या प्रकाराने परिसरात खळबळ आहे तर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मारुती मंदिराची साफसफाई करणारे शंकर जुवर व संतोष काळे हे सकाळच्या सुमारास […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन गर्दी जमवण्याचा प्रयत्न: अंबादास दानवे

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची १२ तारखेला संभाजीनगरला सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेला प्रतिसाद मिळणार नाही हे माहित असल्याने मंत्री संदीपान भुमरे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे. लोकांनी सभेला उपस्थित रहावे म्हणून त्यांना पैसे दिले जात आहेत, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. मुंबईत आज आयोजित पत्रकार […]

अधिक वाचा..