बेट भागात वळसे पाटलांनी विकासाची गंगा आणली; पोपटराव गावडे

शिरुर (अरुणकुमार मोटे) भारतीय राज्य घटनेतील तरतूदीनुसार कुठल्याही परिस्थितीमध्ये एकुण लोकसंख्येच्या ५२ टक्क्यापेक्षा आरक्षण द्यायच नाही. असे नमूद आहे. मात्र आपण ५२ टक्क्यांपर्यंत पोहचलो. आता यातून मार्ग काढला पाहिजे. यासाठी पुन्हा एकदा सरकार कामाला लागले आहे. परंतु समाजाच्या, तरूण पिढीच्या भावना तीव्र आहे. बेरोजगारी वाढत आहे. नोकरी मिळत नाही. त्यामुळे सामाजिक प्रश्नासाठी रस्त्यावर लढून चालणार […]

अधिक वाचा..

रांजणगाव येथे संकष्ट चतुर्थी निमित्त श्री महागणपतीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती हे स्थान महाराष्ट्रातील अष्टविनायकामधील आठवे स्थान म्हणुन प्रसिद्ध असुन त्याचा लौकिक सर्व महाराष्ट्रात नवसाला पावणारा महागणपती म्हणुन आहे. आज (दि 3) रोजी संकष्टी चतुर्थी निमित्त पहाटे ५ वाजता श्रींचा अभिषेक करुन मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. तसेच आज संकष्टी चतुर्थी निमित्त श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या […]

अधिक वाचा..

शिरुर महिला दक्षता समिती आणि आधारछाया फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) पोलीस बांधव नेहमीच सगळ्यांचे भावाप्रमाणेच रक्षण करत असतात. त्यांना कोणताच सण साजरे करण्यासाठी घरी जायला सुट्टी नसते. तुम्ही सर्वांनी त्यांना राखी बांधून बहिणीची जागा भरुन काढली.तसेच पत्रकार बांधवांनाही राखी बांधून तुम्ही समाजात वेगळा आदर्श निर्माण करत आहात. हे सर्वजण नेहमीच भावाप्रमाणेच तुमच्या सोबत आहेत. प्रत्येक पुरुषाने महिलेचा आदरच केला पाहिजे असे प्रतिपादन […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात ड्रोनच्या सहाय्याने पकडली दोन कोटींची वीजचोरी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात वीजबिलाच्या थकबाकीसाठी बंद केलेल्या मीटरला बायपास करुन उच्चदाबाच्या रोहित्राला थेट मोठी केबल जोडून वीजचोरी करणाऱ्या चोराचा महावितरण केडगाव विभागाने ड्रोनच्या सहाय्याने छडा लावला आहे. मुकेश अगरवाल असे या वीजचोराचे नाव असून त्यास महावितरणने २ कोटी ४ लाखांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील महिला संघटनेच्या वतीने सीमेवरील जवानांना “रक्षाबंधन” निमित्त राख्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधनाचे औचित्य साधून आपल्या देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र देशाच्या सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिक बांधवांना राखी पाठवण्याचा उपक्रम माजी सैनिक महिला संघटनेच्या वतीने राबविण्यात आला. तसेच यावर्षी सीमेवरील जवानांना राख्या पाठवण्यासाठी माजी सैनिक महिला संघटना, समस्त महिला आघाडी निमगाव भोगी यांनीही सहकार्य केले. यामध्ये प्रामुख्याने निमगाव भोगीच्या […]

अधिक वाचा..
shirur nagar parishad

पुणे जिल्हाधिकारी यांनी शिरुर नगरपरिषदेला कारवाई करण्याबाबत काढला आदेश

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरात मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे माजी शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनसेचे जनहित कक्षाचे शहराध्यक्ष रवी लेंडे यांनी वेळोवेळी शिरुर शहरात होणाऱ्या चुकीच्या गोष्टीच्या विरोधात आवाज उठवला असुन शिरुर नगरपालिकेला “टाळे” ठोकण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनापासुन सदर व्यक्तींना परावृत्त करावे आणि केलेल्या […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात दोन गटात हाणामारी परस्पर विरोधी फिर्याद दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कर्डेलवाडी (ता. शिरुर ) येथे धक्काबुक्की करुन शिवीगाळ, दमदाटी, जिवे मारण्याची धमकी तसेच दगडाने मारहाण करण्याचा प्रकार घडला असून या बाबत राजेंद्र तुकाराम दसगुडे रा.कर्डेलवाडी व अविनाश गोरक्ष फरगडे (वय २९) वर्षे रा. कर्डेलवाडी मेसाई देवीचे मंदिराजवळ ता. शिरुर जि पुणे. या दोघांनी एकमेकांच्या विरोधात रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल […]

अधिक वाचा..

पिंपरी दुमाला गावाच्या उपसरपंचपदी शरद खळदकर यांची नियुक्ती

रांजणगाव गणपती (तेजस फडके) गावाच्या विकास कामांसाठी सुशिक्षित तरुणांनी राजकारणात लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सहकार मंञी दिलीप वळसे पाटील यांनी केले. पिंपरी दुमाला (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी शरद नानाभाऊ खळदकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांचा सत्कार करताना ते बोलत होते.   यावेळी मावळत्या उपसरपंच जयश्री संदीप सोनवणे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने शरद […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात महिला सर्पमित्रांनी पकडला आठ फुटी अजगर

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात अनेक सर्पमित्र असुन पुरुषांसोबत त्यांच्या खांद्याला खांदा लाऊन महिला सर्पमित्रही सर्परक्षणासाठी काम करत असल्याचे दिसुन येत आहे. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथे नुकताच दोन सर्पमित्र असलेल्या महिलांनी आठ फूट लांबीचा अजगर पकडला. त्यानंतर त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.   शिरुर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील संत निळोबाराय उद्यान या ठिकाणी रात्रीच्या सुमारास अजगर […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील म्हसे येथे जेष्ठ महिलेवर बिबटयाचा हल्ला, महिला थोडक्यात बचावली…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्याच्या बेट भागातील म्हसे येथे एका बिबट्याने तुळसाबाई गंगाराम मुसळे या महीलेवर जीवघेणा हल्ला केला आहे. लघू शंकेसाठी (दि. १९ ) रोजी सांयकाळी ७ च्या सुमाराम घराबाहेर आलेल्या या महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने बाजरीच्या शेतातून येत पाठीमागून हल्ला केला. या हल्ल्यात महिलेच्या पाठीवर, डोक्यात गंभीर जखमा झाल्या आहे. सदर महिलेला […]

अधिक वाचा..