रांजणगाव येथे मुक्तद्वार दर्शनाला लाखों भाविकांची गर्दी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) अष्टविनायकापैकी महत्वाचा गणपती असलेल्या रांजणगाव येथील महागणपती मंदिरात भाद्रपद गणेशोत्सवातील मुक्तद्वार दर्शनाचा आज दुसरा दिवस तसेच रविवार असल्यामुळे आसपासच्या गावातील लाखों भाविकांनी महागणपतीच्या दर्शनाचा लाभ घेतला. अतिशय भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात आणि मोठया उत्साहात भाविकांनी महागणपतीच्या मूर्तीला हात लावून दर्शन घेतले. भाद्रपद महोत्सवाच्या द्वार याञेच्या दुसऱ्या दिवसाला सुरवात होताच पहाटे पासुनच […]

अधिक वाचा..

शिरुर नगरपरिषदेच्या हद्दीतील पदपथावरील विजेच्या खांबातून होतेय वीज चोरी

शिरुर (अरुणकुमार मोटे )शिरुर नगरपरिषद हद्दीतील गोलेगाव रस्त्यावरील ‘सुंदर सृष्टी’ या गृहप्रकल्पामधील बिल्डरने अनाधिकृतपणे गैरमार्गाने नगरपरिषदेच्या पथदिव्यांच्या खांबातून बांधकाम करण्यासाठी वीज कनेक्शन घेऊन वीजचोरी केल्याचे निदर्शनात आले आहे. या वीजेचा वापर सुंदर सृष्टी मध्ये चालु असलेल्या बांधकामाला केला आहे. सन २०१९ पासुन हा वीज चोरीचा प्रकार सुरु असल्याचे समजते.   शिरुर नगरपरिषद नागरिकांच्या करातून पथ […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील स्वप्नील गायकवाड यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांचे खंदे समर्थक आणि कोंढापुरी गावचे माजी सरपंच स्वप्नील गायकवाड यांची नुकतीच मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (शरद पवार गट) पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे केंद्रिय कार्याध्यक्ष आणि संसदरत्न खासदार डॉ अमोल कोल्हे, शिरुर-हवेलीचे आमदार […]

अधिक वाचा..

शिरुर येथील माई छात्रालयात अक्षर मानव संघटना आणि पर्यावरण मित्र बहुउदेशीय संस्थेच्या वतीने निबंध स्पर्धा

शिरुर (तेजस फडके) शिरुर येथील सिंधुताई सपकाळ यांच्या माई छात्रालय येथील विद्यार्थ्यांसाठी अक्षर मानव संघटना आणि पर्यावरण मित्र बहुउदेशीय संस्थेच्या वतीने पर्यावरण मित्र आणि माणूस म्हणजे काय…? या दोन विषयांवर नुकत्याच निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी सर्वच विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उस्फुर्त सहभाग घेतला. याप्रसंगी डॉ संतोष पोटे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर […]

अधिक वाचा..

शिरुर येथे मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महिलांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जालना येथे मराठा बांधव मनोज जरांगे यांनी बेमुदत उपोषण सुरु केले असुन त्यांना पाठिंबा देण्यासाठी शिरुर येथील महिला तहसील कार्यालयाच्या आवारात उद्या मंगळवार (दि 12) रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 च्या दरम्यान एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत.   याबाबत महिलांच्या वतीने शिरुर पोलिस स्टेशन आणि शिरुर […]

अधिक वाचा..
aayushaman-bharat-shirur

शिरुर तालुक्यातील कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली कानउघडणी

शिरुर (अरुणकुमार मोटे) “आपण शासनाच्या आरोग्य सेवेत कार्यरत असताना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची अडचण होणार नाही याची दक्षता घेतानाच रुग्णांना तत्पर व वेळेवर अत्यावश्यक रुग्ण सेवा द्या” अशा कडक शब्दात कवठे-येमाई प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ दामोदर मोरे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ नामदेव पानगे यांनी कान उघडणी केली आहे. “कवठे-येमाई […]

अधिक वाचा..

जालन्यातील लाठीहल्याचा सणसवाडी ग्रामस्थांकडून निषेध

कोरेगाव भीमा (प्रतिनिधी) सणसवाडी (ता.शिरुर) ग्रामस्थांच्या वतीने जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथे मराठा आरक्षणासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा बांधावांवर अमानुषपणे जो काठीहल्ला करण्यात आला त्याचा जाहीर निषेध करण्यात येऊन याबाबतचे निवेदन शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना सरपंच सुवर्णा रामदास दरेकर व ग्रामस्थांनी दिले. यावेळी सणसवाडी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. गावातील सर्व ग्रामस्थ […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सणसवाडी येथे गॅसचा स्फोट; जीवितहानी नाही, घरातील सर्व साहित्य जळून खाक

कोरेगाव भिमा (प्रतिनिधी) शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथील नरके वस्तीवर रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक गॅसचा भडका होऊन राजाराम दत्तात्रय नरके यांचे घर जळाले असून नुकतेच लग्न झालेल्या मुलाचा संसारोपयोगी वस्तू व लग्नाचा बस्ता यामध्ये जळाला असून नरके कुटुंबीयांशी आमदार अशोक पवार यांनी संवाद साधत कुटुंबीयांना धीर दिला असून काळजी करु नका. काही मदत लागल्यास कळवा आम्ही […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलीसांनी शेतीपंप चोरी करणा-या तीन चोरांना अटक करत 10 गुन्हे आणले उघडकीस

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कारेगाव-फलकेमळा येथील मोबाईल टॉवरच्या 46 बॅटऱ्यांच्या चोरी प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध रांजणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात होता. तसेच खंडाळे, वाघाळे, गणेगाव खालसा, भांबार्डे व रांजणगाव इत्यादी ठिकाणी इलेक्ट्रीक रोहीत्र चोरीचे सत्र मागील काही महिन्यापासुन चालू होते. तसेच खंडाळे येथील शेतक-यांच्या शेतीपंप मोटारी चोरीच्या प्रमाणात वाढ […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये शिक्षक दिनानिमित्त तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

रामलिंग महीला उन्नती बहु सामाजिक संस्था व अशोक बापू पवार मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांचा सन्मान  शिरुर (किरण पिंगळे-शेलार) मुलांना शिक्षण हे मातृभाषेतून द्यायला हवे, तेव्हा त्यांचा सर्वागीण विकास होईल. जिल्हा परिषद, नगरपालिका शाळेतील शिक्षक हे हुशारच असतात. तिथे शिकणारी मुलेही हुशार आहेत. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. त्यामुळे सर्व शिक्षकांनी संघटित रहायला हवे असे […]

अधिक वाचा..