ranjangaon-midc-election

रांजणगाव-कारेगाव एमआयडीसी येथील मतमोजणी केंद्रास जिल्हाधिकाऱ्यांची भेट!

रांजणगाव गणपती (पोपट पाचंगे): आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या रांजणगाव-कारेगाव एमआयडीसी (ता. शिरुर) येथील स्ट्रॉंग रुम व मतमोजणी केंद्रास जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी भेट देऊन कामकाजाविषयी उपस्थित अधिकाऱ्यांना योग्य सूचना दिल्या. पाहणी करतानाच जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी उपाययोजनांबाबत काही सूचना दिल्या. लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, त्या अनुषंगाने निवडणूक आयोग, पोलिस आणि […]

अधिक वाचा..
shivajirao adhalrao patil

शिवाजीराव आढळराव पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

पुणे: शिरूर लोकसभेत खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात महायुतीचा उमेदवार कोण असणार? अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या मतदारसंघासाठी अडून असल्यामुळे शिंदे गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांची अडचण झाली आहे. यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अजित पवार यांनी दबावतंत्र अवलंबल्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा […]

अधिक वाचा..
Shivajirao Adhalrao Patil

शिरूर लोकसभेसाठी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पत्ता कट?

पुणेः शिरूर लोकसभेसाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आग्रही असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता शिरुर लोकसभा राष्ट्रवादीच लढवणार असल्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे आढळराव पाटील यांना म्हाडाचे अध्यक्षपद देऊन त्यांचा पत्ता कट केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच शिरूर लोकसभेची जागा लढणार असल्याचे स्पष्ट झाले असून, मुख्यमंत्र्यांसोबत रात्री उशीरा झालेल्या […]

अधिक वाचा..
shivajirao adhalrao patil

शिरूर लोकसभा! शिवाजीराव आढळराव पाटील नरमले…

पुणे : शिरूर लोकसभेसाठी आग्रही असलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना म्हाडाचे अध्यक्षपद देऊन त्यांचा पत्ता कट केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतील तसे काम करणार असल्याची प्रतिक्रिया आढळराव पाटील यांनी दिली आहे. यामुळे आढळराव पाटील नरमले असल्याची चर्चा रंगली आहे. शिरूरच्या उमेदवारीवर बोलताना आढळराव पाटील म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी मला काम […]

अधिक वाचा..
sharad pawar dilip walse patil

मानसपुत्र दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात धडाडणार शरद पवार यांची तोफ…

मंचर (पुणे): मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव मतदारसंघामध्ये शरद पवार यांची आज (बुधवार) तोफ आज धडाडणार आहे. मंचर मधील या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार ही वळसे पाटलांवर निशाणा साधणार आहेत. यामुळे अनेकांचे लक्ष आजच्या सभेकडे लागले आहे. दिलीप वळसे पाटील यांना शरद पवार यांचे मानसपुत्र मानले जायचे. […]

अधिक वाचा..
voter-id

मतदान ओळखपत्र तयार करण्याची घर बसल्या सोपी पद्धत…

मुंबईः नवीन ओळखपत्र तयार करण्यासाठी वा त्यात दुरुस्ती करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रियेचा वापर करता येतो. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरुन एक एप डाऊनलोड करावे लागेल. त्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुमच्या मुळ पत्त्यावर, घरपोच हे नवीन वोटर कार्ड, मतदान ओळखपत्र मिळेल. ऑनलाईन मतदान ओळखपत्र तयार करण्यासाठी अँड्राईड आणि iOS मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअर आणि प्ले […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात जबरदस्तीने करायला लावली वेठबिगारी; महिलेने केला गुन्हा दाखल…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात जबरदस्तीने वेठबिगारी करावयास लावल्याने शिरूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. एका ऊस ठेकेदाराने काही कामगार तीन महिन्याच्या कामासाठी ऊस तोडण्यासाठी चांडोह (ता. शिरूर) येथे आणले आहे. तीन महीने उलटल्यानंतरही कामगारांची ऊस तोडायची इच्छा नव्हती. त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांची मानसिक तयारी नसताना जबरदस्तीने काम करायला […]

अधिक वाचा..
Shirur Robbery

शिरूर तालुक्यात लघूशंकेसाठी घराबाहेर पडणे पडले महागात…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे पाठोपाठ न्हावरा येथे एका दाम्पत्याला तीन अनोळखी चोरट्यांनी गंभीर मारहाण करत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मणीमंगळसुत्र व रोख रक्कम असा एकुण १ लाख ६५ रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. लिलाबाई परशुराम नागवडे (वय 50, रा नागवडे वस्ती, न्हावरे, ता शिरूर) यांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल आहे. याबाबत सविस्तर हकिकत अशी […]

अधिक वाचा..
akshay-haral

शिरुर तालुका सोशल मीडिया सचिव पदी अक्षय हराळ यांची निवड!

मांडवगण फराटा: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीच्या शिरुर तालुका सोशल मीडिया सचिव पदी अक्षय जयसिंग हराळ यांची निवड करण्यात आली आहे. मंडवगण फराटा येथील सामाजिक कार्यकर्ते अक्षय हराळ यांना शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार व रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक संभाजी फराटे, माजी संचालक दत्तात्रय फराटे व मांडवगणच्या माजी सरपंच लतिकाताई जगताप […]

अधिक वाचा..
shirur-bus-fire

पुणे-नगर महामार्गावर शिरुर मध्ये एसटीच्या मालट्रकला आग अन्…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर-पुणे रस्त्यावर शिरूरजवळील बोऱ्हाडे मळ्यात मालवाहतूक करणारी एसटी महामंडळाची मालट्रक (महाकार्गो बस) जळून पुर्णपणे खाक झाली असून, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहाणी झाली नाही. शुक्रवारी (ता. ९) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर तीन तासांहून अधिक काळ या महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाल्याने वाहनांची रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. पिंपरी-चिंचवड आगाराची ही महाकार्गो बस […]

अधिक वाचा..