crime

मोठी बातमी! शिरुर तालुक्यात फिनेलच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती; १७४ किलो ड्रग्ज जप्त

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील मिडगुलवाडीत फिनेलच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती होत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, नार्कोटिक्स विभागाकडून कंपनी सील करण्यात आली आहे. दोघांना अटक करण्यात आली असून, १७४ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. सध्या देशभरासह राज्यभरात ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजत आहे. मुंबई व पुणे जिल्ह्यात मोठी टोळी कार्यरत असल्याचे बोलले जात असताना शिरुर […]

अधिक वाचा..
grampanchayat

शिरूर तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर…

शिरूर (तेजस फडके) शिरूर तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे इच्छुक उमेदवार निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत. शिरूर तालुक्यातील जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये मुदत संपलेल्या आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका तर आठ ग्रामपंचातींच्या पोटनिवडणूका जाहिर झाल्या आहेत. आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका… शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती, शिरूर ग्रामीण, वाजेवाडी, रांजणगाव सांडस, सरदवाडी, अण्णापूर, तर्डोबाचीवाडी व कर्डेलवाडी […]

अधिक वाचा..
shirur-tehsil-office

शिरूर महसूल विभागाचे अधिकारी भ्रष्टाचार करून ही मोकाट…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात दोन वर्षापुर्वी वाळूचे प्रकरण चांगलेच गाजले होते. तत्कालीन तहसिलदार यांनी लाखो रुपयांचा अपहार करुन वाळूच्या गाडया सोडून दिल्या होत्या. संबंधित प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. शिरूर तालुक्यात दोन वर्षापुर्वी वाळूचे प्रकरण चांगलेच गाजले होते. तत्कालीन तहसिलदार यांनी लाखो रुपयांचा अपहार करुन वाळूच्या गाडया सोडून दिल्या होत्या. काहींचे ब्रास कमी दाखवून […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

विद्याधाम प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांकडून होतेय नियमबाह्य बेकायदेशीर वसुली…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील विद्याधाम प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य बेकायदेशीर वसुली होत असल्याची तक्रार पुढे आल्यानंतर मनसेची शाळेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिरूर शहरातील शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्याधाम प्राथमिक शाळेने शाळेने इ. १ ली ते इ. ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यवर्धन एक मूल्यशिक्षण कार्यक्रमानुसार सवैधानिक आणि मूल्यांवर आधारित या विषयाच्या आधारे नवीन […]

अधिक वाचा..
dog-attack

शिरूर शहरात मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाट; चिमुकल्यावर हल्ला…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाट झाला आहे. शिरूर येथील गुजर मळा परिसरात मंगळवारी (ता. ३) सकाळी चार भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात आयुष भास्कर हरिहर (वय ४) हा बालक गंभीर जखमी झाला आहे. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष हा घरासमोरील प्रांगणात खेळत असताना अचानक भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. घाबरून पळत असताना खाली […]

अधिक वाचा..
suryakant-badhe-waghale

वाघाळे विविध विकास सोसायटी कडून सभासदांना दहा टक्के लाभांश!

वाघाळे: विविध विकास कार्यकारी सोसायटीची 61वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन सुर्यकांत बढे यांचे अध्यक्षतेखाली शुक्रवार (ता. २९) सकाळी सोसायटी कार्यालयात संपन्न झाली. वाघाळे विविध विकास कार्यकारी सोसायटी संस्थेचे 822 सभासद आहेत. संस्थेचे भाग भांडवल 3724790 रुपये असून संस्थेने 1/4/2023 ते 31/3/2024 अखेर 54223897 रुपये कर्ज वाटप केले असून संस्थेस निव्वळ नफा 1249956.44 रुपये एवढा झाला […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police

रांजणगाव MIDC पोलिसांची मोठी कारवाई; 8 गावठी पिस्टल जप्त; धाबे दणाणले…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगीक वसाहत असल्याने परिसरात दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने 18 सप्टेंबर 2023 रोजी रांजणगाव येथील एका पेट्रोल पंपासमोर संकेत संतोष महामुनी आणि प्रथमेश संतोष नवले यांना अटक करुन त्यांच्या कडून 1 गावठी पिस्टल व 3 सिनेस्टाईल कोयते जप्त करण्यात आले होते. सदर गुन्ह्याचा तपास सुरु […]

अधिक वाचा..
laxmibai-bendra-aamble

शिरूर तालुक्यातील लक्ष्मीबाई बेंद्रे यांचे १०७व्या वर्षी निधन

शिरूर: शिरूर तालुक्यातील आंबळे गावातील लक्ष्मीबाई ऊर्फ ताई शंकरराव बेंद्रे (पाटील) यांचे वयाच्या १०७व्या वर्षी सोमवारी (ता. १८) वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे चार मुलगे, सात मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. संजय बेंद्रे, निलेश बेंद्रे, उत्कर्ष बेंद्रे, शालन लेणे, सुलेचना खंडागळे, सुमन थिटे, डॉ. सीमा सातव, डॉ. विठ्ठल सातव, वंदन मोरे, उद्योजक […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police

रांजणगाव MIDC पोलिसांची धडाकेबाज कारवाई; पिस्टल घेणाऱ्यांचे दणाणले धाबे…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीमध्ये औद्योगीक वसाहत असल्याने MIDC तील कंपन्यामध्ये अनेक कामगार कामानिमित्त येत असतात. त्यातील काहीजण याठिकाणी दहशत निर्माण करण्याचे काम करत आहेत. रांजणगाव पोलिसांनी गावठी बनावटीचे एक पिस्टल, जिवंत काडतूस आणि कोयता बाळगल्याप्रकरणी संकेत संतोष महामुनी (रा.शिरुर,ता.शिरुर जि पुणे तसेच प्रथमेश संतोष नवले (रा.कारेगाव ता शिरुर जि. […]

अधिक वाचा..
ncp logo

शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराची राष्ट्रवादीकडून घोषणा…

पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून तर शिरुर लोकसभा मतदारसंघातून मधून खासदार डॉ. अमोल कोल्हे हे उमेदवार असतील, अशी घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (शरद पवार गट) जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या पदवाटप कार्यक्रमानंतर पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. जयंत पाटील म्हणाले, ‘जागावाटपाबाबत महाविकास आघाडीच्या […]

अधिक वाचा..