shirur-manipur-nivedan

शिरूर तहसील कार्यालयात धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन…

शिरूर (अरुणकुमार मोटे): मणिपुरात कायदा-सुव्यवस्था कोलमडली असून, व्यवस्थेचा निषेध करण्यासाठी शिरूरमध्ये शुक्रवारी (ता. ४) धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. धरणे आंदोलनाबाबत नायब तहसिलदार प्रकाश मुसळे यांना निवेदन देण्यात आले आहे. मणिपुर राज्यात अनैसर्गिक हिंसाचार परिस्थिती हाताळण्यात अयशस्वी झालेल्या व्यवस्थेचा निषेध करण्यासाठी शिरूर तहसिल कार्यालय आवारात शुक्रवारी नागरीक धरणे आंदोलन करणार आहे. मणिपुर राज्यात महिलांच्या लैंगिक […]

अधिक वाचा..
Beaten

शिरूर तालुक्यात उपसरपंचाने केली व्यावसायिकास मारहाण…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): वडनेर खु. (ता. शिरूर) येथील मोटार वायडिंग व्यावसायिकास उधारीचे पैसे मागितल्याचा राग आल्याने विद्यमान उपसरपंचाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. उपसरपंचाविरुद्ध शिरूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. उधारीचे पैसे मागितल्याचा राग आल्याने वडनेर चे उपसरपंच विक्रम बाळू निचीत आणि त्यांच्या आईने मारहाण केल्याची तक्रार ज्ञानदेव रामभाऊ निचीत यांनी शिरूर पोलिसांत दाखल […]

अधिक वाचा..
atul-kohakade

शिरूर शहरातील व्यावसायिक अतुल कोहकडे यांचे निधन…

शिरूर: शिरूर शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक अतुल बाबासाहेब कोहकडे (वय ४६) यांचे हृदयविकाच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. शिरूर शहरामध्ये अतुल कोहकडे यांचे मोबाईल शॉपीचे दुकान आहे. व्यवसायानिमित्त त्यांचे अनेकांसोबत जिव्हाळ्याचे संबंध होते. शांत आणि मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी अनेक मित्र जोडले होते. शिवाय, शिरूर शहरातील व्यापारी वर्गासोबत त्यांचे चांगले संबंध […]

अधिक वाचा..
akshada midugale

शिरूर तालुक्यातील मुलीच्या उपचारासाठी हवाय मदतीचा हात!

शिरूर: शिरूर तालुक्यातील गरीब कुटुंबातील मुलीला उपचारासाठी पुणे शहरातील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलीच्या उपचारासाठी सहा लाख रुपयांची गरज आहे. आपण मदतीचा हात पुढे केल्यास तिच्यावरील उपचारासाठी मोठी मदत होणार आहे. मुलीच्या नातेवाईकांनी मदतीचे आवाहन केले आहे. शिरूर तालुक्यातील कोरडवाहू असलेल्या मूळ मिडगुलवाडी गावचे पण पोटाची खळगी भरण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी येथे मोलमजुरी […]

अधिक वाचा..
leopard koregaon bhima

कोरेगाव भीमा येथे तळ ठोकून बसलेला बिबट्या अखेर जेरबंद…

शिरुर (तेजस फडके) कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे भर लोकवस्तीत तळ ठोकून बसलेल्या बिबट्याला एका कंपनीच्या खोलीमध्ये शिरल्यानंतर कोंडण्यात यश आले आहे. बिबट्याला वनविभागाच्या मदतीने जेरबंद करण्यात यश मिळाल्याने कोरेगाव भीमा येथील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. कोरेगाव भीमा येथील आनंद पार्क, जवळील शेत, गोठ्या जवळ बुधवारी दुपारपासून तळ ठोकून असलेल्या बिबट्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे […]

अधिक वाचा..
grampanchayat-karegaon

कारेगाव ग्रामपंचायतच्या अजब गावकारभाऱ्यांचा गजब कारभार…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC तील अनावश्यक कचरा कारेगावच्या हद्दीत बेकायदेशीरपणे जाळल्याने मोठया प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. पर्यावरणाला हानी पोहचत असताना कारेगाव ग्रामपंचायतच्या अजब गावकारभाऱ्यांचा गजब कारभार पुढे आला आहे. विद्यमान सरपचांनी रांजणगाव MIDC तील एका कंपनीला पञ व्यवहार करुन तुमच्या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत असल्याचे म्हटले होते. दुस-याच महिन्यात […]

अधिक वाचा..
shirur police

शिरूर पोलिसांनी अंतरजिल्हा मोटर सायकल चोरांना ठोकल्या बेडया…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिसांनी अंतरजिल्हा मोटर सायकल चोरांना बेडया ठोकल्या आहेत. एकूण सात मोटार सायकली जप्त केल्या असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. शिरूर पोलिस ठाणे हद्यीत गेल्या काही काळात झालेल्या मोटार सायकल चोरी उघडकीस आणन्याच्या दृष्टीने शिरूर पोलिस स्टेशन मध्ये पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी वेगवेगळी पथके वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होती. सदर गुन्हयातील […]

अधिक वाचा..
balrangbhumi parishad

पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी नाट्य छटा स्पर्धेचे आयोजन!

पुणे (तेजस फडके): बाल रंगभूमी परीषद पुणे जिल्हा व निळू फुले कला अकादमी आयोजीत नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती नाट्य छटा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बालरंगभूमी परीषद पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षा दीपाली शेळके यांनी दिली. ‘बालरंगभुमी परिषद पुणे जिल्हा दरवर्षी ऑगस्ट महिन्यात १ ली ते १० वीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी कै. नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती नाट्यछटा […]

अधिक वाचा..

शिरुर नगरपरिषद हद्दीत अनाधिकृत जीओचे पोल काढण्याचे तात्काळ आदेश द्यावे अन्यथा…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरात फायबर प्रा.लि, या कंपनीला पोल उभारण्याची परवानगी दिलेली आहे. परंतु सदर कंपनीने नगरपरिषदेने घालून दिलेल्या अटी व शर्थीचा भंग केला आहे. शिरूर नगरपरिषद हद्दीतील ‘शिवसेवा’ मंडळाच्या गाळ्यांसमोर सिमेंटच्या रस्त्यावरच बेकायदा पोल बसवण्यासाठी ब्रेकरच्या साहय्याने आत्ताच नव्याने करण्यात आलेला सिमेंटचा रस्ता खोदून पोल उभे केलेले आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या साईट पट्यावर […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरूर तालुक्यात किशोरवयीन मुलाला ऊसात नेऊन अनैसर्गिक अत्याचार…

शिरुर (तेजस फडके) शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीत एक खळबळ जनक घटना घडली आहे. आई वडील लहानपणीच वारलेल्या व आजी-आजोबा सांभाळ करत असलेल्या किशोरवयीन मुलाला बळजबरीने दारू पाजत नराधमाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची अमानुष घटना घडली आहे. शिरूर तालुक्यात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित किशोरवयीन मुलाने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल […]

अधिक वाचा..