dimbe dam

सावधान! डिंभे धरण ९३ टक्के भरले…

घोडनदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी… सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरूर, आंबेगाव तालुक्याला वरदान ठरत असलेले हुतात्मा बाबू गेनू जलाशय अर्थात डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात मागील तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे आज (गुरुवार) ९३ टक्के भरले आहे. दक्षता म्हणून घोडनदी पात्रात आज दुपारी धरणातून २५२० पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्याची माहिती डिंभे धरण […]

अधिक वाचा..
Baburao Pacharne

शिरूर-हवेलीचे माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचे निधन…

शिरूर (तेजस फडके): शिरूर-हवेलीचे माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबूराव पाचर्णे (वय ७१) यांचे आज (गुरुवार) निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच शिरूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. शिरूर तालुक्याच्या राजकारणातील संघर्षशील नेतृत्व माजी आमदार बाबूराव पाचर्णे हे मागील बाबूराव पाचर्णे […]

अधिक वाचा..
Shirur Police

शिरुर पोलिसांनी खून करुन पळालेल्या आरोपीस ४८ तासात केली अटक…

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील डोंगरगण गावच्या हद्दीतील हॉटेल रानवारा येथे महेश उर्फ सुनिल नामदेव सरोदे (वय ४५) या हॉटेल कामगाराचा 8 ऑगस्ट 2022 च्या मध्यरात्री दरम्यान त्याच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या अनंता रघुनाथ कांबळे या कामगाराने खून करुन पळ काढला होता. पोलिसांनी तातडीने हालचाल करत या आरोपीस ४८ तासात अटक केली आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या […]

अधिक वाचा..
Balrangbhumi Saradwadi

नाट्यछटा स्पर्धेमध्ये सरदवाडीत तब्बल २८३ विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग!

शिरूर: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी नाट्यछटा स्पर्धा हा स्तुत्य उपक्रम आहे. महाराष्ट्रातील रसिक जनतेला यामधूनच पुढे अभिनेते, कलाकार पहायला मिळतील. मी सुद्धा कलेचा, कलाकारांचा कदर करणारा कार्यकर्ता आहे. शिक्षणा बरोबर विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा विकास शाळा करत आहेत. ही कौतुकास्पद व आभिमानाची गोष्ट आहे, असे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी बालरंगभूमी परिषदेच्या पुरस्कार वितरण […]

अधिक वाचा..
body

शिरूर तालुक्यात विहिरीत आढळला महिलेचा व चिमुकल्याचा मृतदेह…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील येवले माथा येथे शेतकरी कुंडलिक तुकाराम येवले (रा. आण्णापूर) यांच्या विहीरीमध्ये अज्ञात २५ ते ३० वर्षाच्या महिलेचा मृतदेह व २ वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. संबंदीत महीलेची ओळख पटलेली नाही. महिलेचा व मुलाचा खुन की आत्महत्या? या विषयी तर्कविर्तक लढवले जात आहेत. शवविच्छेदन अहवाल हाती आल्यानंतर खरे […]

अधिक वाचा..
DamuAnna Ghode Marriage

ग्रामपंचायतीच्या निकालानंतर दामुशेठ घोडे यांच्या विवाहाची चर्चा…

सविंदणे (अरूणकुमार मोटे): टाकळी हाजी सह माळवाडी, सरदवाडी, म्हसे या ग्रामपंचायंतीवर वर्चस्व मिळवून बेट भागाचे किंगमेकर ठरलेले दामुशेठ घोडे यांनी टाकळी हाजी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान टाकळी हाजीच्या पहिल्याच प्रचार सभेत ही माझी निवडणूक नसून माझे लग्न आहे असे विधान केले होते. या विधानावर विरोधी पॅनल कडून जोरदार टीका करण्यात आली होती. ५ ऑगस्ट रोजी निवडणुकीच्या […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

जांबुत येथे सत्ता परिवर्तन जय मल्हार ग्रामविकास पॅनल ६-५ ने विजय

शिरुर (अरुणकुमार मोटे ) शिरुर तालुक्यातील जांबुत येथे खिवराज फिरोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली जय मल्हार ग्रामविकास पॅनल ने बाजी मारली असली तरी खिवराज फिरोदीया हे मात्र पराभूत झाले असून निकालाची परिस्थिती “गड आला पण सिंह गेला” अशीच झाली आहे. गावच्या माजी सरपंच जयश्री जगताप व राहुल जगताप यांच्या आदर्श ग्रामविकास पॅनेलचा ६-५ ने धुव्वा उडवत हि […]

अधिक वाचा..
rupali khandale

शिरुर तालुक्यात पतीने केला पत्नीचा खून…

शिक्रापूरः जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे पतीने पत्नीशी वारंवार होणाऱ्या वादातून पत्नीला मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे. यामध्ये रुपाली सचिन खंडाळे या महिलेचा मृत्यू झाला आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे सचिन दत्तात्रय खंडाळे याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील सचिन खंडाळे व रुपाली खंडाळे या दांपत्यामध्ये सचिन दारू […]

अधिक वाचा..
Waghale Nagpanchami

वाघाळे गावात नागपंचमी निमित्त दगडी गोट्या उचलून शक्तिप्रदर्शन…

वाघाळेः वाघाळे (ता. शिरूर) गावामध्ये आज (मंगळवार) नागपंचमी निमित्त दगडी गोट्या उचलून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाघाळे गावामध्ये नागपंचमीच्या दिवशी हनुमान मंदिरासमोर दगडी गोटी उचलण्याची फार जुनी परंपरा आहे. कोरोनामुळे दोन वर्षे हा उत्सव होऊ शकला नाही. परंतु, सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उतावरणात अनेक पहिलवानांनी गोट्या उचलून आनंद साजरा […]

अधिक वाचा..
Ghodganga sugar Factory

घोडगंगा कारखान्यावर कारवाईची टांगती तलवार…

शिरुर (तेजस फडके): घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने अद्यापही शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम न दिल्यामुळे कारखान्यावर कारवाई होऊ शकते, तसा कारवाईसाठीचा प्रस्ताव देखील प्रादेशिक सहसंचालक पुणे धनंजय डोईफोडे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना पाठविला आहे, अशी माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे धनंजय डोईफोडे यांनी दिली. घोडगंगा कारखान्याची निवडणूक तात्पुरती स्थगित झाली आहे. त्यात कारखान्याचे चेअरमन, आमदार […]

अधिक वाचा..