‘गुल्हर’ मराठी चित्रपट राज्यभर प्रदर्शित; मोहनवर कौतुकाचा वर्षाव…

‘गुल्हर’ या मराठी चित्रपटाचे ग्रामीण भागातील युवकाने कथालेखन केले असून, चित्रपट राज्यभर प्रदर्शित झाला आहे. शिरूर तालुक्यातील युवक मोहन एकनाथ पडवळ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे… काव्य लेखन, सामाजिक लेखन, पथनाट्य, व्यवसायिक नाटक आणि आता गुल्हर या चित्रपट क्षेत्रातील लेखणीच्या माध्यमातून दमदार पदार्पण. असा प्रवास असलेले कवठे येमाई (ता. शिरूर) येथील युवक मोहन एकनाथ पडवळ […]

अधिक वाचा..

शिरूर तहसिल कार्यालयात तीन एंजट करताहेत नागरिकांची लूट…

सविंदणे: शिरुर तहसिल कार्यालयात रेशनकार्ड ऑनलाईन करण्यासाठी नागरीकांची ३ एजंटामार्फत मोठी आर्थिक लुट होत आहे. या ३ खाजगी व्यक्तींना शासनाचा कुठलाही पगार नसताना ते काम करत आहे. शिरुर शहरातील गॅस एजन्सीमार्फत मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या कर्मशियल वापरासाठी काळया बाजारात गॅस टाक्यांची विक्री केली जाते. याबाबत संबंधित गॅस एजन्सी धारकांवर शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. या […]

अधिक वाचा..
Beaten

शिरूर तालुक्यात निवडणूकीच्या वादातून दोन गटात जोरदार हाणामारी

शिरूर: शिरूर तालुक्यातील रावडेवाडी येथे काही दिवसांपुर्वी विकास सोसायटीची निवडणुक झाली होती. जय-पराजयामुळे विरोधात प्रचार केल्याच्या कारणामुळे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली असून, दोन्ही गटाकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबत फिर्यादी भाऊसाहेब भिकाजी (पानगे वय 36 वर्ष धंदा- शेती रा. निमगाव दुडे, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी १) सागर वसंत रावडे, २) अरुण वसंत […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात कंटेनरच्या विचित्र अपघातात महिलेचा मृत्यू

पुणे-नगर महामार्गावर व्हर्लपुल कंपनीसमोर दोन कंटेनरची कारला धडक रांजणगाव गणपती: पुणे-नगर महामार्गावर पुण्यावरुन अहमदनगरकडे जाणाऱ्या कारला पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने ती कार डिव्हायडरवरुन पलीकडे गेल्याने अहमदनगर वरुन पुण्याकडे निघालेल्या कंटेनरनची या कारला धडक बसल्याने कार मधील लिलाबाई बबन काळे (वय 67) या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असुन याबाबत दिलीप बबन काळे […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील रहस्यमय मृत्यू झालेल्या तीन अनोळखी प्रेतांचे गुढ कायम…

शिरूर: शिरूर तालुक्यातील रहस्यमय मृत्यू झालेल्या तीन अनोळखी प्रेतांचे शिरूर पोलिसांना अद्याप गुढ उकलेले नाही. शिरूर पोलिस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण निर्माण झाला आहे. एक वर्षापुर्वी मलठण येथील शिंदेवाडीच्या दर्गामध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झालेले प्रेत मिळाले होते. परंतु, अदयाप ही व्यक्ती कोण व तिचा मृत्यू कसा झाला याची अदयाप शिरूर पोलिसांकडून उकल होऊ […]

अधिक वाचा..

कुरळीच्या ग्रामसेविका ‘नॉट रिचेबल’

मांडवगण फराटा: कुरुळी (ता. शिरूर) येथील ग्रामसेविका कामावर सतत गैरहजर असल्यामुळे गावातील नागरिकांना गैरसोईला सामोरे जावे लागत आहे. आपला पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी कामावर दांड्या मारण्यास सुरवात केलेली असून, त्या आपल्या कामावर नियमित येत नसल्याच्या तक्रारी गट विकास अधिकारी यांच्याकडे गावकऱयांनी केल्या आहेत. नुकतेच सुरु झालेले आर्थिक वर्ष आणि त्याबरोबर होणारी गावातील सर्व विकास कामे ठप्प […]

अधिक वाचा..
Sandeep Lawande

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी…

शिरूरः सुजल ड्रायक्लिनने काही दिवसातच ग्राहकांचा विश्वास संपादन करत यशस्वी भरारी घेतली आहे. कोंढापुरीसह शिरूर, शिक्रापूर आणि कोरेगाव भीमा येथे शाखा सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनीचे डायरेक्टर संदीप लवांडे यांनी दिली. कोंढापुरी येथील कात्रज डेअरी शेजारी असलेल्या लवांडे वस्तीवर सुजल ड्रायक्लिनची सुरवात झाली. ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळू लागल्यानंतर शिरूर, शिक्रापूर आणि […]

अधिक वाचा..
Mahaganpati

श्री महागणपती: रांजणगाव गणपती

श्री महागणपती (रांजणगाव, ता. शिरूर, जि. पुणे) ः पुणे-नगर महामार्गावर पुणे-वाघोली-शिक्रापूरमार्गे रांजणगाव हे श्री क्षेत्र शिरूरच्या अलीकडे २१ किलोमीटरवर तर पुण्यापासून ५० किलोमीटरवर आहे. रांजणगावचे श्री महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून, मुख्य रस्त्यावर उजवीकडे आहे. दक्षिणायन आणि उत्तरायण यांचा मध्य काळात सूर्याचे किरण मूर्तीवर पडतील, अशी मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी केली आहे. मूळ मूर्तीला “महोत्कट’ असे नाव […]

अधिक वाचा..
Suryakant Palande

ध्येयवादी काका: सूर्यकांत गुलाबराव पलांडे…

सूर्यकांत गुलाबराव पलांडे (माजी आमदार) शिरूर, जि. पुणे, गाव मुखई, जन्म करंदी येथे आजोळी श्री. ढोकले मामाचे घरी झाला. पलांडे कुटुंबाचा मुखई येथे पूर्वजांनी बांधलेला प्रशस्त वाडा आहे. इनामदार म्हणून अनेक गावे या घराण्याकडे होती. अगदी अलीकडे संस्थाने खालसा होईपर्यंत मोराची चिंचोली येथील देवस्थानचे मानपान या कुटुंबाकडे होते. श्री. सूर्यकांत पलांडे १९५७ मधील त्यावेळेच्या व्हर्नाकुलर […]

अधिक वाचा..
Kawthe Yemai Mandir

कवठे येथील जाग्रुत देवस्थान ‘श्री येमाई देवी’

संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम भाविक भक्तांचे श्रद्धास्थान, आराध्यदैवत, कुलदैवत असणारे शिरुर (जिल्हा पुणे) तालुक्यातील शिरुर-मंचर रोड वर कवठे गावच्या दक्षिणेस असणारे श्री येमाई देवी देवस्थान एक जागृत देवस्थान असून, या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची मनातली इच्छा पुर्ण होत असल्याने भक्तगणांची नवस फेडण्यासाठी येथे नेहमीच गर्दी असते. कवठे गावास ऐतिहासिक वारसा ही लाभलेला असून गावाजवळून वाहणाऱ्या घोडनदीच्या किनारी […]

अधिक वाचा..