शिरुर तालुक्यात नगरसेविका महिलेच्या पतीला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) नजीक कासारी फाटा येथे जमिनीच्या मोजणीच्या वादातून नगरसेविका महिलेच्या पती सह त्याच्या मित्राला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मनोज दंडवते, अजय झेंडे, राकेश शेलार, प्रशांत शिंदे, बाजी हिंगमिरी यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) नजीक कासारी फाटा परिसरात गणेश पवार […]

अधिक वाचा..

सर्व जिल्ह्यात तीस एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालत

शिक्रापूर (शेरखान शेख): राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार सर्व जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार ३० एप्रिल २०२३ रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे. पुणे जिल्हयासह सर्व ठिकाणी होणाऱ्या या लोक अदालतमध्ये प्रलंबित असलेली […]

अधिक वाचा..

एखादा प्रकल्प होत असताना स्थानिकांना विश्वासात घेतले पाहिजे; शरद पवार 

मुंबई: एखादा महत्त्वाचा प्रकल्प राज्यात होत असताना त्यात स्थानिकांना विश्वासात घेतले पाहिजे. त्याला विरोध असेल तर त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. काल रिफायनरीला झालेल्या विरोधात आंदोलकांची तीव्र नाराजी माध्यमांमधून समोर आली. कोकणात नवीन काही होत असेल आणि त्यावर स्थानिकांच्या तीव्र भावना असतील तर कोणत्याही सरकारने त्याची नोंद घेतली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय […]

अधिक वाचा..

टीका करणे सोप, पण सर्वसमावेशक कृतीसाठी कुणीच पुढे येत नाही…

राज ठाकरे बोलले, ते अर्धसत्य मुंबई: तरूण पत्रकारांच्या मनात आग आहे, त्यांना काही करून दाखवायचं आहे.. मात्र ते ज्या माध्यमात काम करतात त्यांचे मालकच विकले गेले आहेत.. स्वत:च्या नोक-या टिकविण्यासाठी पत्रकारांना तडजोड करावी लागते”. असं राज ठाकरे मुलाखतीत म्हणाले, लोकमतच्या कार्यक्रमात खा. अमोल कोल्हे व अमृता फडणवीस यांनी घेतलेल्या मुलाखतीत,माध्यमांच्या निष्पक्षतेबद्दल प्रश्न विचारल्यावर राज ठाकरे […]

अधिक वाचा..

धक्कादायक! प्राध्यापकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार, आरोपी प्राध्यापकसह पत्नीवर गुन्हा दाखल…

औरंगाबाद: छ. संभाजीनगर शहरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडीस आली असून वसतिगृहात राहणे सुरक्षित नसल्याचे सांगत एका विद्यार्थिनीला घरी पेइंग गेस्ट म्हणून राहण्यासाठी नेऊन तिच्यावर सहायक प्राध्यापकाने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. अशोक गुरप्पा बंडगर असे त्याचे नाव असून तो नाट्यशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक आहे. मीळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगरच्या बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणासाठी […]

अधिक वाचा..

दिवंगत माता-पित्यांचे स्वप्न केले साकार, जांबूतचा कृष्णा बनला अखेर पोलीस

शिरुर (अरुणकुमार मोटे): पोलीस किंवा सैन्य दलात भरती होण्यासाठी लाखो तरुण तयारी करत असतात मात्र अत्यंत कठीण परिस्थितीत तयारी करून मोजकेच यशस्वी होतात. लहानपणातच आई – वडिलांचे छत्र हरपल्यानंतर पोरके झालेल्या जांबूत (ता. शिरूर) येथील कृष्णा धनसिंग सावंत याची नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात पुणे शहर पोलीस दलात निवड झाली आहे. चासकमान (ता.खेड) येथे कृष्णाचा जन्म […]

अधिक वाचा..

रामलिंग-शिरुर रस्त्यावर खारओढा येथे कचऱ्याचे साम्राज्य

शिरुर:- शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतच्या हद्दीत रामलिंग-शिरुर रस्त्यावर खारओढा येथे आसपासचे रहिवासी मोठया प्रमाणात कचरा टाकत असल्यामुळे कचऱ्याचे ढीग साठले असुन रस्त्यावरुन येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांना या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे त्रास होत असुन ग्रामपंचायतने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे. शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतची हद्द मोठी असून काही ठिकाणी ग्रामपंचायतच्या कचरा गोळा करणाऱ्या गाड्या दोन ते तीन […]

अधिक वाचा..

शिरुर मध्ये संवादिनीच्या वतीने जागतिक पुस्तक दिन साजरा

शिरुर:- एक मंदिर बांधले म्हणजे एक हजार भिकारी तयार करणे आणि एक ग्रंथालय बांधणे म्हणजे लाखो विद्वान निर्माण करणे होय. जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या. भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसे जगायचे ते शिकवेल असे भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे असे […]

अधिक वाचा..

नागरिकांना न्याय देण्याच्या दृष्टीने संसदीय आयुधांचा योग्य वापर करावा

मुंबई: नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधींनी अधिवेशनात विविध संसदीय आयुधांचा वापर करावा. जेणेकरून नागरिकांना न्याय देण्यास सहकार्य लाभेल आणि समाजकारण व राजकारणास वळण देता येईल, असे प्रतिपादन उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी केले. आज विधीमंडळात विविध संसदीय आयुधे, समिती पद्‌धत, विधेयके या विषयांवर विधानपरिषद सदस्यांसाठी कृतीसत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा कुजलेला मृतदेह

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील मांजरेवाडी येथे चासकमान कालव्याच्या कडेला एका पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. करंदी (ता. शिरुर) येथील मांजरेवाडी चासकमान कालव्याचे जवळ विनायक सातपुते हे जनावरे चारण्यासाठी घेऊन गेले असताना त्यांना सदर ठिकाणी एका व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील […]

अधिक वाचा..