पुतण्याच्या लग्नात डान्स करत असताना काही सेकंदात झाल होत्याच नव्हत…

पुणे: मागच्या काही दिवसांत थंडीत वाढ झाल्याने रक्त गोठण्याच्या प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होत असते. यामुळे हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कोणाला वाहन चालवताना झटका येऊन धक्का बसत आहे तर कुणाला नाचताना हृदयविकाराचा झटका येत आहे. दरम्यान वाराणसीमध्ये अशीच एक घटना घडली आहे. पुतण्याच्या लग्नात नाचताना अचानक ह्रदयविकाराचा झटका आल्याने जागीच कोसळले. वाराणसीच्या पिपलानी कटरा अवघडनाथ […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. आत्मविश्वासात वाढ होईल. नव्या कामाची सुरुवात करण्यासाठी दुपारी 2 ते 3 ही वेळ चांगली आहे. गुंतवणूक करण्याची योजना आखाल. वृषभ: प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यास तुम्ही तयार असाल. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. व्यापारात नफा होईल. हाती घेतलेलं काम वेळेत पूर्ण करा. नवी जबाबदारी स्वीकारण्यास घाबरू नका तर ती […]

अधिक वाचा..

आता सरपंच किंवा सदस्य होण्यासाठी ‘इतकं’ शिक्षण लागणारच

पुणे: ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच होण्यासाठी उमेदवार किमान *सातवी पास* असण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला असून गावाचे कारभार पाहण्यासाठी शैक्षणिक अर्हतेची मर्यादा घालण्यात आली आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने सरपंच अथवा सदस्यांचा शैक्षणिक अर्हतेबाबत आदेश जारी केल्यानुसार, 1 जानेवारी 1995 नंतर जन्मलेल्या व्यक्तीला ग्रामपंचायत सरपंच अथवा सदस्य होण्यासाठी किमान *सातवी पास* असणे आवश्यक आहे. सातवी पासचे […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलिस ठाण्यातील दोघांची सहायक फौजदार तर तिघांची हवालदारपदी पदोन्नती

रांजणगाव गणपती (तेजस फडके): पोलीस दलातील पोलिसांच्या सेवा कार्यकाळानुसार बढती झालेली असताना पुणे ग्रामीण पोलीस दलातील तब्बल चौतीस जणांची पोलीस नाईक पदाहून पोलीस हवालदार पदावर बढती झालेली आहे. रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस हवालदार संजीव दाजीराम गायकवाड आणि गुलाब शिवराम येळे यांची सहायक फौजदारपदी बढती झाली. तर पोलिस नाईक म्हणुन कार्यरत असलेले माणिक […]

अधिक वाचा..

वाल्हेकरवाडी, चिंचवड हद्दीत वाजवी किंमतीत व्यापारी गाळे घेण्याची सुवर्णसंधी

पुणे:​ पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयामार्फत पेठ क्र. 30 वाल्हेकरवाडी, चिंचवड येथील Convenience Shopping Center मधील एकूण 31 व्यापारी गाळ्यांची 80 वर्षाकरिता भाडेपट्ट्याने ई-लिलाव पध्दतीने विक्री करण्यासाठी दि.14 डिसेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यापैकी तळमजल्यावर 7 व्यापारी गाळे असून त्याकरिता रु.87,100/- प्रति चौ.मी.तर पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर 24 व्यापारी गाळे असून […]

अधिक वाचा..

पोलीस भरतीची मोठी अपडेट

औरंगाबाद: राज्यात पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. आता अर्ज भरण्यासाठी आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून फडणवीस यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोलीस भरतीसाठी आमच्याकडे आतापर्यंत 11 लाख 80 हजार अर्ज आले […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांना नडू नका….

मुंबई: अतिवृष्टी, संततधार यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने राज्यातील शेतकरी त्रस्त आहे. त्यात पीक विम्याचा परतावाही शेतकऱ्यांना मिळत नाही. यावरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक पवित्रा घेत शेतकऱ्यांना नडू नका असा इशारा पीक विमा कंपन्यांना दिला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी आज आयसी आय सी आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स […]

अधिक वाचा..

फुलाला सुगंध मातीचा मालिका पुन्हा पाहायला मिळणार

मुंबई: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका फुलाला सुगंध मातीचा लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेला आणि मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिल. मालिका जरी गोड वळणावर थांबत असली तरी लोकाग्रहास्तव या मालिकेचं पुन:प्रसारण करण्यात येणार आहे. ५ डिसेंबरपासून सायंकाळी ६ वाजता फुलाला सुगंध मातीचा मालिका पहिल्या भागापासून प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहता येणार आहे. या […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेतील कार्यक्रमाला छगन भुजबळांची दांडी

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे मोठ्या उत्साहात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित केलेला असताना आयोजकांकडून प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलेले छगन भुजबळ यांनी अखेर या कार्यक्रमाकडे पाठ फिरवत दांडी मारल्याचे दिसून आले असून यामध्ये आयोजकांचे अपुरे नियोजन कि आयोजकांचे अपयश असा सवाल उपस्थित केला जात आहे. […]

अधिक वाचा..

सणसवाडीत युवकाचा कुऱ्हाडीने मारहाण करून खून

शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात नऊ युवकांवर गुन्हे दाखल शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे 3 दुचाकीहून आलेल्या 9 जणांच्या टोळक्याने एका युवकाला कुऱ्हाडीने मारहाण केली. या घटनेत गोपाळ महादेव लुडकर (वय २७) या युवकाचा खून झाला आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अज्ञात 9 युवकांवर खूनप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सणसवाडी (ता. शिरुर) येथील […]

अधिक वाचा..