पाबळला कंटेनर मधून पत्र्याचे रोल पडून मोठा अपघात

सुदैवाने जीवित हानी नाही मात्र दूध डेअरी सह वाहनांचे नुकसान शिक्रापूर: पाबळ (ता. शिरुर) येथे बेल्हा जेजुरी या मुख्य रस्त्यावर एका कंटेनर मधून वाहतूक करण्यात येत असलेले तब्बल २२ टन वजनाचे २ पत्र्याचे रोल रस्त्यावर पडून अपघात होऊन येथील दूध डेअरी सह काही वाहनांचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. पाबळ (ता. शिरुर) येथे बेल्हा […]

अधिक वाचा..

नागपंचमीनिमित्त शिव भक्ताकडून नरेश्वर चरणी दीड किलो चांदीचे शिवलिंग

शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथील श्री क्षेत्र नरेश्वर मंदीर येथे एका शिव भक्ताकडून नागपंचमी निमित्ताने तब्बल दीड किलो वजनाचे चांदीचे शिवलिंग अर्पण करण्यात आले असून सदर शिवलिंग स्थानिक पदाधिकाऱ्यांसह शिव पुजारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील श्री क्षेत्र नरेश्वर मंदीर येथे एका शिव भक्ताने देवावरील श्रद्धा जपत मंदिरासाठी तब्बल दीड किलो […]

अधिक वाचा..

मानव विकास परीषदेच्या युवक कार्याध्यक्षपदी शहाजी खळदकर

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): पिंपरी दुमाला (ता. शिरुर) येथील शहाजी संतू खळदकर यांची मानव विकास परिषदेच्या शिरुर तालुका युवक कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नुकतेच त्यांना या निवडीचे पत्र देण्यात आले. एक वर्षासाठी हि निवड असणार आहे. मानवी हक्कासाठी ही संस्था प्रयत्नशील असून, सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण राज्यात हि संस्था काम करत आहे. समाज्यातील भांडवलशाहीकडून […]

अधिक वाचा..

संजय गांधी अनुदान योजनेतील वयोवृद्ध लाभार्थ्यांची होतेय ससेहोलपट

शिरुर (अरुणकुमार मोटे): संजय गांधी अनुदान योजनेतील वयोवृद्ध, विधवा ,परीतक्त्या लाभार्थ्यांना उत्पन्न दाखला जमा करण्याच्या जाचक नियमामुळे मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांची ससेहोलपट होत असल्याने ज्येष्ठांबरोबरच महिलांमधुन मोठया प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत असुन संजय गांधी अनुदान योजनेतील लाभार्थ्यांच्या देयक यादी मधील लाभार्थ्यांना उत्पन्न दाखला, आधार कार्ड व बँक पासबुकची झेरॉक्स प्रत आदी कागदपत्रे जमा करण्याबाबत व […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुर पोलिसांची गुटख्यावर मोठी कारवाई; 4 आरोपींना अटक

शिरुर (तेजस फडके): राजस्थान राज्यातून अहमदनगर मार्गे पुण्याकडे जाणाऱ्या गुटख्यावर सापळा रचुन शिरुर पोलिसांनी मोठी कारवाई करत गुटखा वाहतुक करणाऱ्या प्रवासी लक्झरी बसससह 4 जणांना ताब्यात घेतले असून ६ लाख ३० हजार २५० रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच जप्त करण्यात आला आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 3 ऑगस्ट रोजी प्रवासी वाहतुक करणाऱ्या लक्झरी बस मधुन राजस्थान […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्षभर जागर करणार: अविनाश क्षीरसागर

शिक्रापूर: भारताला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष पूर्ण होत असताना स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असून महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे विचार आणखी प्रभावीपणे रुजवण्यासाठी वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करत क्रांतिकारकांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन शिरुर तालुका मुख्याध्यापक संघाचे खजिनदार प्राचार्य अविनाश क्षीरसागर यांनी केले. पाबळ (ता. शिरुर) येथील भैरवनाथ […]

अधिक वाचा..

महाविद्यालयीन युवतींनी निर्भयपणे वावरावे: ज्योती आहेरकर

शिक्रापूर: महाविद्यालयीन युवतींनी शाळेत येत जात असताना कोणत्याची अमिषाला, त्रासाला बळी न पडता निर्भय पणे वावरावे वेळ प्रसंगी पोलिसांची मदत घ्यावी असे आवाहन शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस नाईक ज्योती आहेरकर यांनी केले आहे. कासारी (ता. शिरुर) येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात महाविद्यालयीन युवक व युवतींना मार्गदर्शन करताना महिला पोलीस नाईक ज्योती […]

अधिक वाचा..

करंदीत नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी

महिलांनी लुटला हळदीकुंकू सह फुगड्यांचा आनंद शिक्रापूर: करंदी (ता. शिरुर) सह परिसरात श्रावण महिन्यातील महत्वाचा असा पहिलाच नागपंचमी सन मोठ्या उत्साहात साजरा झाला असून दोन वर्षांनी प्रथमच नागपंचमी पूर्णपणे खुल्या पद्धतीने साजरा होत असल्याने महिलांनी हळदीकुंकू सह फुगड्यांचा आनंद लुटल्याचे देखील दिसून आले आहे. करंदी (ता. शिरुर) येथे नागपंचमी सन साजरा होत असताना गावातील सर्व […]

अधिक वाचा..
Horoscope

Horoscope Today: जाणून घ्या आपले आजचे राशिभविष्य

मेष: संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल. व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करा. नवीन कामातून फायदा होईल. वृषभ: प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. व्यवसायात गुंतवणूक केल्यास फायदा होईल. नात्यात सावध रहा. कोणाशीही भांडू नका मिथुन: काहींना कामानिमित्त प्रवास होतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल. कुटुंबात आनंद […]

अधिक वाचा..

मराठा महासंघाच्या वतीने अनोख्या पद्धतीने नागपंचमी सण साजरा

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): अखिल भारतीय मराठा महासंघ व रामलिंग महिला उन्नती संस्थेने नागपंचमीच्या प्रथेला फाटा देत वारुळात दूध सोडण्याऐवजी गरजू चिमुकल्यांना दूध वाटप केले एवढेच नव्हे तर विधवांना सुवासिनींचा मान देऊन अनोख्या पद्धतीने नागपंचमीचा सण साजरा केला. नागपंचमीला सुवासिनीच्या हस्ते नागदेवतेची पूजा करुन नागाला दूध म्हणून या दिवशी शेकडो लिटर दूध वारुळांमध्ये सोडले जाते. […]

अधिक वाचा..