ranjangaon-midc-police station

शिरुर तालुक्यात व्यवसायासाठी कर्ज देण्याच्या निमित्ताने फसवणुक केल्याने उद्योजकाची आत्महत्या

मुख्य बातम्या शिरूर तालुका

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव गणपती येथील एका उद्योजकला तीन व्यक्तींनी कर्ज मिळवुन देतोअसे सांगत कमिशनची मागणी केली होती ल. त्याप्रमाणे त्या उद्योजकाने कर्ज काढुन त्या सर्वांना ठरल्याप्रमाणे कमीशन दिले. परंतु तीनही व्यक्तींनी कमिशन घेऊन कर्ज काढुन न देता फसवणुक केल्याने संबंधित उद्योजकाने आत्महत्या केली असल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन (Ranjangaon MIDC Police Steshan) येथे तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रांजणगाव गणपती येथील जे एम एन इंजिनिअरींग प्रा.ली. कंपनी वाढविण्याकरीता कंपनीचे मालक संग्राम आबुराव सातव (वय ४६), रा.शेळके वस्ती, मराठी शाळेपाठीमागे, रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि.पुणे यांना इंडोस्टार हाऊसिंग फायनान्स, शाखा खराडी, पुणे चे मॅनेजर उपेंद्र यांनी पाच कोटी रूपये कर्ज मिळवुन देण्याच्या बदल्यात ४० लाख रुपये कमीशन आणि विशाल घाटगे याने ५० लाख रूपये कर्ज मिळवुन देण्याच्या बदल्यात ५ लाख रुपये कमिशन व तसेच झंजाड नावाच्या व्यक्तीने पण कर्ज मिळवुन देण्याच्या बदल्यात ३ लाख रुपये कमीशनची मागणी केली होती.

 

त्याप्रमाणे संग्राम सातव यांनी रहाते घरावर कर्ज काढुन, तसेच लोकांकडुन उसने पेसे घेवुन वरील तिघांना ठरल्याप्रमाणे कमीशन दिले होते. परंतु त्यांनी ठरल्याप्रमाणे कर्ज मंजुर केलेले नाही. त्यामुळे आपली फसवणुक केली असल्याचे दिसुन आल्याने उद्योजक संग्राम सातव यांनी त्यांना कर्जाबाबत फोन केला असता वरील तिनही लोकांनी त्यांचा फोन घेतला नाही. तसेच त्यांना भेटले नाहीत. त्यामुळे संग्राम सातव यांना मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यामुळे संग्राम सातव यांनी आत्महत्या केली आहे अशी फिर्याद त्यांची पत्नी जनाबाई संग्राम सातव (वय ४२) यांनी रांजणगाव पोलिस स्टेशन येथे वरील तिघांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.

 

रांजणगाव पोलिसांनी १) उपेंद्र यशवंत पाटील इंडोस्टार हाऊसिंग फायनान्स, शाखा खराडी, पुणे चे मॅनेजर २) विशाल घाटगे (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) तसेच ३) मच्छिंद्र पोपट झंजाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असुन यातील उपेंद्र यशवंत पाटील (रा.थेरगाव पुणे) तसेच मच्छिंद्र पोपट झंजाड (रा.सांगवी सुर्या, ता.पारनेर जि. अहिल्यानगर या दोन आरोपीना अटक करण्यात आली असुन त्यांना ५ एप्रिल २०२५ पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे. रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके पुढील तपास करत आहेत.

रांजणगाव पोलिसांची कारेगाव येथील यश इन चौकात गुटख्यावर कारवाई

त्या बहुचर्चित खुण प्रकरणातील दोषी आधिकारी, कर्मचाऱ्यांवर कधी होणार कारवाई…?

त्या बहुचर्चित खुनाचा व्हिसेराच तब्बल आठ महिन्याने प्रयोगशाळेत जमा; वरिष्ठांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष