पाबळ: कान्हूर मेसाई आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने स्थानिक नागरिक, शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतशिवारात तसेच वस्त्यांच्या परिसरात बिबट्या वारंवार दिसत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कान्हूर परिसरातील शेतांमध्ये आणि गावालगतच्या भागात काल रात्री पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे रात्री-अपरात्री शेतीकामासाठी, पाणी भरण्यासाठी किंवा जनावरांच्या देखभालीसाठी बाहेर पडणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी अथवा अनुचित घटना घडलेली नसली तरी बिबट्याच्या मुक्त संचारामुळे नागरिक आणि पाळीव जनावरांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
View this post on Instagram
दरम्यान, वनविभागाने या परिस्थितीची तातडीने दखल घेऊन बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात पिंजरा लावावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तसेच वन कर्मचाऱ्यांनी रात्रीची गस्त वाढवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशीही मागणी होत आहे.
“गेल्या काही दिवसांपासून गावात आणि शेतशिवारात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काल रात्रीही बिबट्या गावाजवळ दिसल्याने शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. वनविभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”
– अॅड. तुकाराम पुंडे
शिरूरमध्ये मध्यरात्री बिबट्याचा थरार! नागरिक सतर्क, वन विभाग अलर्ट मोडवर
भरदिवसा बिबट्याचा हल्ला; तरुण शेतकरी गंभीर जखमी, परिसरात दहशत
त्या ज्येष्ठ नेत्याच्या नातवावर बिबट्याचा धक्कादायक हल्ला
Video: वाघाळे गावात बिबट्याने पोल्ट्री फार्ममधून पाळीव कुत्रा नेला उचलून…