leopard

शिरूर तालुक्यात बिबट्याने घातली महिलेवर झडप अन् ती झडप…

शिरूर तालुका

शिरूर : शिरूर तालुक्यातील मांडवण फराटा येथील गोकुळनगर परिसरात एका महिलेवर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. महिलेने दाखवलेल्या धाडसामुळे आणि प्रसंगावधानामुळे त्या बिबट्याच्या जबड्यातून सुखरूप बचावल्या आहेत. लिलाबाई बाळासाहेब फराटे असे धाडसी महिलेचे नाव आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

लिलाबाई बाळासाहेब फराटे या गुरुवारी (ता. २९) सायंकाळी नेहमीप्रमाणे आपल्या उसाच्या शेतात काम करत होत्या. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अचानक उसाच्या शेतातून एक बिबट्या त्यांच्यासमोर आला आणि काही समजण्याच्या आतच बिबट्याने लिलाबाई यांच्यावर झडप घातली. लिलाबाई यांनी प्रसंगावधान राखून स्वतःला झटकन एका बाजूला झुकवले. लिलाबाई ऐनवेळी बाजूला झाल्यामुळे बिबट्याची ती झडप चुकली आणि तो दुसऱ्याच दिशेला गेला या काही सेकंदांच्या थरारात लिलाबाईंचा जीव थोडक्यात वाचला.

लिलाबाई यांनी तातडीने शेतातून थेट घर गाठले. सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबाला आणि गावकऱ्यांना या थरारक घटनेची माहिती दिली. दरम्यान, या घटनेनंतर गोकुळनगर आणि परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. वनविभागाने या परिसरात तात्काळ पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे.

कान्हूर मेसाई परिसरात बिबट्याचा वाढता वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

भरदिवसा बिबट्याचा हल्ला; तरुण शेतकरी गंभीर जखमी, परिसरात दहशत

शिरूरमध्ये मध्यरात्री बिबट्याचा थरार! नागरिक सतर्क, वन विभाग अलर्ट मोडवर

शिरूर तालुक्यात गाईची शिकार करताना बिबट्या पडला विहिरीत…

Video: वाघाळे गावात बिबट्याने पोल्ट्री फार्ममधून पाळीव कुत्रा नेला उचलून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत