संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com
शिरूर, ता. ११ जुलै २०२६ : शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत www.shirurtaluka.comने आवाज उठवत सातत्याने बातम्यांची मालिका सुरू ठेवली आहे. शिक्रापूर-मलठण रस्त्याची सध्याची अवस्था अतिषय बिकट झाली असून, चिखलामुळे वाहने चालवणे आवघड झाले आहे. संपूर्ण रस्ता चिखलमय झाला असून, ठेकेदार नेमका कुठे आहे? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
शिक्रापूर ते मलठण दुरुस्तीचे काम गेल्या पाच महिन्यांपासून सुरू आहे. थोडा-थोडका नव्हे तर संपूर्ण रस्ताच खोदून ठेवल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. रस्त्यावरून प्रवास करताना अनेक अपघात झाले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून, रस्ता चिखलमय झाला आहे. रस्त्यावरून नागरिकांनी प्रवास करूच नये का? कितीही बातम्या आल्या तरी काही फरक पडत नाही? कितीही अपघात झाले तरी आम्हाला कोणी विचारणारे नाही. आमच्या वेळेनुसार आणि आम्हाला हवा तसा आणि वाटेल तसा रस्ता बनवणार? अशी ठेकेदाराची भावना आहे का? असे एक ना अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
शिक्रापूर-मलठण रस्त्यावरून नागरिकांना रात्री-अपरात्री प्रवास करावा लागत आहे. परिसरात बिबट्याची भिती आहे. पण, संबंधित रस्त्याचे काम मनमानी पद्धतीने काम सुरू ठेवून ठेकेदार अनेकांना वेठीस धरत आहे. यामागे नेमके कोण आहे? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात भारत अवकाशात झेप घेत असताना शिक्रापूर-मलठण रस्ता तयार होण्यास किती दिवस लागणार? हा प्रश्न सध्यातरी गुलदस्त्यात आहे. नागरिकांची सहनशिलता सुटत चालली असून, ठेकेदाराने सहनशिलतेचा अंत पाहू नये, अन्यथा पुढील प्रसंगांना सामोरे जावे लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
(क्रमशः)
View this post on Instagram
शिक्रापूर-मलठण रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात आला वेग!
शिक्रापूर-मलठण रस्त्याचे काम फक्त कागदावरच सुरू आहे काय?
शिक्रापूर-मलठण रस्त्याची अवस्था जशीच्या तशी; ठेकेदाराने धरले वेठीस!
शिक्रापूर-मलठण रस्त्याबाबत नागरिकांच्या नेमक्या मागण्या कोणत्या?
शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या कामांबाबत नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा…
शिक्रापूर ते मलठण रस्ता खोदणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी…