pooja-gai-shirur

शिरूरमध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच महिलेचा जीव गेल्याचा गंभीर आरोप…

क्राईम मुख्य बातम्या

शिरूर: शिरूर शहरातील बाबुरानगर येथील एका खासगी रुग्णालयात हाताच्या फ्रॅक्चरवर शस्त्रक्रिया सुरू असताना एका विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पूजा राहुल गई (वय २८) असे मृत महिलेचं नाव आहे. याप्रकरणी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच पत्नीचा जीव गेल्याचा गंभीर आरोप तिच्या पतीने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर शहरातील बाबुरानगर परिसरात असलेल्या ‘कोळपे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल’मध्ये ही घटना घडली. ४ ऑगस्ट रोजी दुचाकीवरून जात असताना अचानक पडल्यामुळे पूजा गई यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांच्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांनी त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

पूजा यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी ६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. शस्त्रक्रिया सुरू असताना अचानक ऑपरेशन थिएटरमध्ये काहीतरी गडबड असल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. पती राहुल गई यांनी संशय आल्याने ऑपरेशन थिएटरचा दरवाजा ठोठावला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर सुमारे तीन तासांनी डॉक्टरांनी बाहेर येऊन पूजा गई यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती कुटुंबीयांना दिली. यामुळे मृत महिलेच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. उपचारादरम्यान डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणामुळेच पूजा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप पतीने केला आहे. या घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी तातडीने रुग्णालयात धाव घेऊन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात वैद्यकीय निष्काळजीपणा निष्पन्न झाल्यास दोषी डॉक्टरांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केली आहे. आता ससून रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याने सर्वांचे लक्ष या अहवालाकडे लागले आहे.

शिरूर Video ! दोन डॉक्टरांचे प्रसंगावधान, दोन तासांची मृत्यूशी झुंज; ४५ मिनिटे अखंड CPR मुळे रुग्णाला जीवदान…

शिरूर तालुक्यातील त्या गावचे आरोग्य केंद्र ठरतंय ‘मृत्यू केंद्र’ ; बेजबाबदार डॉक्टरांवर ग्रामस्थांचा संताप 

माझ्याकडे रुग्णांना गोळ्या औषधे घेण्यासाठी का पाठवत नाही म्हणत शिरूरमध्ये रुग्णालयात डॉक्टरवर हल्ला

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरुर; हायटेक ‘गर्भलिंग निदान’ रॅकेटमध्ये तालुक्यातील नामांकित डॉक्टरांचा सहभाग…? 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत