मंचर (कैलास गायकवाड) : शिरूर तालुक्याच्या सीमा परिसरात दुचाकीवरून येऊन दागिने हिसकावून पळून जाणाऱ्या तीन सराईत चोरांना पारगाव (कारखाना) पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दहा लाख ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व एक पल्सर गाडी जप्त केली आहे. या सराईत चोरांनी आठ गुन्हेगारी कृत्याची कबुली दिली आहे.
खडकवाडी येथील सिंधुबाई बाळू घाडगे (रा. गाडकवाडी तालुका खेड) या महिलेचे दागिने चोरल्या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला होता. या परिसरातील सुमारे १५० सी.सी.टीव्ही फुटेज तपासल्यानंतर कवठे येमाई पर्यंत चोरांचा माग निघत होता. कवठे यमाई (ता. शिरूर) येथील अजय देवकर उर्फ भोऱ्या रा देवकर वस्ती कवठे यमाई याच्यावर संशयाची सुई फिरली. त्या अनुषंगाने गोपनीय बातमीदाराला सदरा सी.सी.टीव्ही फुटेज दाखवले व बातमीदाराकडून सदर आरोपी व त्याची माहिती घेतली असता, त्याच्या विरोधात जिल्ह्यातील घारगाव पोलिस ठाणे येथे सोन्याचे दुकान लुटल्या बाबत तसेच शिरूर पोलिस ठाणे येथे खून व खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समजले. यावरून डी.बी.पथक आरोपीच्या घरी गेले असता आरोपीला त्यांचा संशय आल्यामुळे शेतामधून पळून जाऊ लागला त्याचा जवळपास एक ते दीड किलोमीटर पाठलाग करून ताब्यात घेतले.
View this post on Instagram
पारगाव (कारखाना) पोलिस ठाणे येथे आणले आता सदर आरोपी यांनी त्याचे साथीदार ओंकारा शेंडगे (रा. डोंगरगण ता. शिरूर जिल्हा पुणे) व अतिश दिलीप गव्हाणे (रा.कोहकडी ता. पारनेर जिल्हा अहिल्यानगर) यांच्यासोबत गुन्हे केल्याची कबूली दिली.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पारगाव (कारखाना) पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलिस हवालदार अविनाश कालेकर, पोलिस हवालदार अमोल वडेकर, पोलिस अंमलदार संजय साळवे, मंगेश अभंग, चंद्रकांत गव्हाणे, पोलिस मित्र रामदास वाळुंज यांनी केली.
शिरूर तालुक्यात प्रियकराने केली चिमुकल्याची हत्या; लिव्ह इन मुळे लाईफ धोक्यात…
शिरूरमध्ये तरुणाला अडवून पाच जणांकडून बेदम मारहाण; कामावरून काढल्याच्या रागातून हल्ला
शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई
शिरूर! वरुडे येथील आरोपीचे स्टेटस; लवकरच एकाचा मर्डर करून जेलमध्ये जाणार…