ग्रामीण भागातील युवक युवती ठरताहेत सोशल मिडीयाचे बळी

क्राईम मुख्य बातम्या

सोशल मिडीयातून सायबर क्राईम सह फसवणूकच्या घटनांमध्ये वाढ

शिक्रापूर (शेरखान शेख) ग्रामीण भागामध्ये यापूर्वी मोबाईलवर फोन करुन बँकेची माहिती विचारून येणाऱ्या कोड नमणारने नागरिकांच्या बँकेतील पैसे गायब होण्याच्या मोठ्या घटना घडत होत्या मात्र आता वेगळ्या पद्धतीने सोशल मिडीयावर संभाषण करुन तसेच युवक व युवतींचे फोटो ईडित करुन युवकांना वेगवेगळ्या पद्धतीने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत अल्स्याने ग्रामीण भागातील युवक युवती सोशल मिडीयाचे बळी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

ग्रामीण भागात सध्या युवकांसह युवतींमध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाटसअपचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून सध्या प्रत्येक व्यक्ती या सोशल मिडीयाच्या आहारी गेलेला आहे. मात्र अलीकडील काळामध्ये अनेकांना या सोशल मिडियाचे वेद लागलेले असून युवक युवती वेगवेगळ्या पद्धतीने नागरिकांना आकर्षक दिसले असे फोटो काढून जास्तीत जास्त लाईक व कमेंट मिळवण्यासाठी सोशल मिडीयावर प्रसारित करत असतात.

मात्र सायकर क्राईम करणारे गुन्हेगार अशा फोटोना हेरुन ते फोटो मॉर्क करुन अथवा त्या फोटोतून अश्लील व्हिडिओ बनवून सदर व्यक्तीला पाठवून त्यांना ब्लॅकमेल करत आर्थिक भुर्दंड देत असल्याचे प्रकार सर्रास सुरु झालेले आहेत. अनेकदा नागरिकांचे फेसबुक, इन्स्टाग्राम हॅक करुन त्यांच्या जवळील व्यक्तींचा शोध घेत त्यांना मेसेज करुन तातडीने गरज असल्याचे दाखवत देत असलेल्या बारकोडवर पैसे पाठवण्यास सांगत आहेत, मात्र काही वेळाने सदर प्रकार सोशल मिडीया हॅक करुन झाल्याचे समोर येत असल्याने कित्येकांची फसवणूक होत आहे, मात्र युवकांनी देखील अशा बनावट कॉल कडे आकर्षित न होता सावध राहून सतर्क राहण्याची देखील गरज आहे.

सोशल मिडीयाबाबत काय खबरदारी घ्यावी…

फेसबुक, इन्स्टाग्राम मध्ये ओळखीचीच लोके घ्या, प्रोफाईल आपल्याला जॉईन लोकांनाच दिसेल अशी सेटिंग करा, सोशल मिडीयाचे पासवर्ड वेळोवेळी बदला, पासवर्ड कोणाला सांगू नका, हॅकर चा संशय आल्यास पोलिसांना सांगा, अनोळखी व्यक्तीने आपला फोटो मागितल्यास फोटो देऊ नये, फेसबुक अनोळखी व्यक्तींसाठी लॉक ठेवावे यांसह आदी खबरदारी प्रत्येक व्यक्तीने घेणे गरजेचे आहे.

फेसबुक ठरतेय धोकादायक…

फेसबुक वापरातून बनावट फेसबुकच्या माध्यमातून स्वतः मुलगी आहे असे भासवून मुलींच्या शब्दरचनेत बोलून मुलांना त्यांच्या मोबाईल नंबर मागत त्यावर बोलून मुलांना अश्लील भाषेत बोलत याकडे आकर्षित करण्याचे प्रकार घडत असल्याने फेसबुकचा वापर देखील धोकादायक ठरत असल्याचे दिसत आहे.

नागरिकांनी खबरदारी घ्यावी; प्रवीण खानापुरे

नागरिकांनी आपला पासवर्ड कोणाला देऊ नये, ओटीपी कोणाला सांगू नये तसेच एखादी लिंक मोबाईल मध्ये आल्यास सदर लिंक ओपन करु नये प्रकारच्या घटना घडत असल्यास नागरिकांनी सायबर क्राईम तसेच पोलिसांची मदत घेणे गरजेचे असून नागरिकांनी अशा फोन व मेसेजच्या आहारी जाणे टाळावे असे सायबर क्राईम विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी सांगितले.

नागरिकांनी बनावट फोन कॉल, मेसेज, फेसबुक, इन्स्टाग्राम यापासून सावध राहण्याची गरज असून अनेकदा पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना सोशल मिडीयाद्वारे देखील सावधानतेचा इशारा देण्यात येत असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या इशाऱ्याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.