सविंदणे येथे धोकादायक विदयुत पोल मुळे जीवीतहानी होण्याचा धोका

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरुर) येथे फाकटे रस्त्यावरील किठे मळयाजवळ विदयुत वाहिनीचा पोलअर्धा वाकला असून तो केव्हाही कोसळण्याच्या मार्गावर आहे. हा विद्युत पोल रस्त्यालगत असून जवळच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. नागरीकांसह अनेक चिमुकली मुले या ठिकाणी सतत वावरत असतात. तो केव्हाही कोसळू शकतो अश्या अवस्थेत असून महावितरण विभाग मात्र याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याचे विजय शेटे, मोहन किठे यांनी सांगितले आहे.

सविंदणे परीसरात असे अनेक धोकादायक पोल वाकलेले आहेत. अनेक ठिकाणी तारा लोबंकळत असून त्या तुटण्याचा मार्गावर आहे. तसेच अनेक विदयुत रोहीत्रांच्या फ्युज पेटींची दुरावस्था आहे. बऱ्याच दिवसापासून मेंटनेसची कामे न झाल्याने अपघात होऊन दुर्घटना घडू शकतात. वेळीच ही दुरुस्तीची कामे महावितरणने न केल्यास महावितरण कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.