Bhima river

शिरूर तालुक्यात गणपती विसर्जनादरम्यान भीषण घटना, युवक भीमा नदीत बुडाला…

शिरूर तालुका

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे हद्दीतील भीमाशेत येथे गणपती विसर्जनाचा उत्साह असतानाच दुर्दैवी घटना घडली आहे. शनिवारी (ता. ६) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास विसर्जनासाठी गेलेला भीमराव लक्ष्मण चेरले (वय 30, रा. शिर्शी, ता. कंधार, जि. नांदेड, सध्या रा. भीमाशेत, तळेगाव ढमढेरे) हा युवक भीमा नदीत बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणपती विसर्जनासाठी नदीत उतरलेले भीमराव चेरले हे पाण्यात गेल्यानंतर वर आलेच नाहीत. नदीपात्र खोल असून पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ते वाहून गेले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती समजताच गावकऱ्यांनी तसेच उपस्थित मंडळींनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली आहे. पोलिस आणि स्थानिक बचाव पथकानेही घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य सुरू केले असून, रात्री पहाटे पर्यंत शोध मोहीम राबवण्यात आली आहे. परंतु, अद्याप चेरले यांचा शोध लागलेला नाही.

दरम्यान, नागरिक मोठ्या संख्येने नदीकाठी जमले असून हळहळ व्यक्त करत आहेत. पुढील शोधकार्य पोलिस व बचाव पथकाच्या मार्फत सुरू आहे.

कुत्राही मैत्रीला जागला! बिबट कुत्र्याच्या हल्ल्यात सहकारी कुत्र्याची मित्राला वाचविन्यासाठी धडपड…

रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त तालुकास्तरीय आदर्श शिक्षिक पुरस्कार २०२५ वितरण

शिरूर नगरपरिषदेचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव; विसर्जनासाठी अनोखी दिशा 

शिरूर तालुक्यातील बापलेकाचा विहिरीत विजेच्या धक्क्याने मृत्यू

शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे नर बिबट्या जेरबंद ; वनविभागाची कारवाई